
टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या सोशल मीडियावर आणि मुलाखतींमध्ये त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याच्यासोबत फ्लाइटमध्ये झालेल्या वादाचा किस्सा सांगितला. या किस्स्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
इरफान पठाणने सांगितलं की, 2006 मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. कराचीहून लाहोरला जाण्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी संघ एका फ्लाइटने प्रवास करत होते. या प्रवासादरम्यानच आफ्रिदीने मस्करीत इरफानचे केस विस्कटले आणि मजेत त्याला “बाळ” म्हणत चिडवले.
इरफानला हे अजिबात आवडलं नाही. त्याने तत्काळ प्रत्युत्तर देत आफ्रिदीला विचारलं – “तू कधीपासून माझा बाप झालास?” हे ऐकताच आफ्रिदी भडकला आणि त्याने पठाणशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. फ्लाइटमधील वातावरण काही काळ तंग झालं होतं.
या वादानंतर पठाणने आणखी एक किस्सा सांगितला. फ्लाइटमध्ये त्याच्या शेजारी पाकिस्तानी अष्टपैलू अब्दुल रझाक बसला होता. इरफानने मजेत रझाकला विचारलं की, पाकिस्तानात कोणत्या प्रकारचं मांस मिळतं. रझाकने त्याला मांसबाबत सविस्तर सांगायला सुरुवात केली.
तेवढ्यात पठाणने शेजारी बसलेल्या आफ्रिदीची खिल्ली उडवत म्हटलं, "इथे कुत्र्याचं मांस मिळतं का? कारण आफ्रिदीने बहुतेक कुत्र्याचं मांस खाल्लं आहे, म्हणूनच तो इतका भुंकतोय."
इरफानचा हा किस्सा ऐकून रझाक अवाक् झाला होता, तर आफ्रिदी काही काळ शांत झाला होता. हा किस्सा अनेक वर्षांनी पठाणने मुलाखतीत उघड केला असून चाहत्यांमध्ये आणि क्रिकेटप्रेमींमध्ये यावर जोरदार चर्चा रंगली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.