Drunk and Drive Accident | Goa Taxi  Dainik Gomantak
गोवा

Drunk and Drive Accident: पार्टी-मद्यपान ठरताहेत अपघातांचे कारण! गोवा टॅक्सी सेवा वापरा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत.

Kavya Powar

Drunk and Drive Accident: सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. यामध्ये मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे जास्त अपघात होत असल्याचे समोर आले आहे. मद्यपान करून होणाऱ्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने पार्टीत जाणाऱ्यांना मग ते स्थानिक असो की पर्यटक, घरी किंवा हॉटेलमध्ये परतण्यासाठी टॅक्सी सेवा निवडण्याचे आवाहन केले आहे.

काल (शुक्रवारी) गोवा टॅक्सी अॅप लॉन्च करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी टॅक्सी सेवा वापरल्यास रस्ते अपघातात लक्षणीय घट होऊ शकते असे मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या या मताला पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनीही आपली संमती दिली.

ते म्हणाले की, गोव्यातली पार्टी लाइफ हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा पैलू असला तरी, यामुळे अनेकदा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पार्टी केल्यानंतर आपल्या ठिकाणी परतण्यासाठी स्थानिक/पर्यटकांनी आपल्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गोवा टॅक्सी सेवेचा वापर करावा.

गोवा टॅक्सी ॲपची खासियत

  • टॅक्सी बुक करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘गोवा टॅक्सी ॲप’ सहज डाऊनलोड.

  • आतापर्यंत सुमारे ३० हजार पर्यटकांनी घेतला सेवेचा लाभ

  • कारपुलिंग आणि इतर उपक्रमांच्या प्रोत्साहनासाठी किनारपट्टी, औद्योगिक वसाहती आणि महत्त्वाच्या ठिकाणी सेवा.

  • प्रवाशांसाठी एसओएस (आणीबाणीच्या परिस्थितीत).

  • चालकांसाठी एसओएस (अपघात/ब्रेकडाऊनसंदर्भात)

  • दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी टॅक्सी बुक करणे सहजसोपे.

  • स्वस्त दरात चालकासहीत कॅब : स्वचलित कार किंवा बाईकपेक्षा श्रेयस्कर.

  • युनिफाईड टॅक्सी ॲपप्रणाली वापरून प्रवासी चालकास गुण देणे शक्य.

  • अयोग्य वर्तनाच्या कोणत्याही घटनांची करता येणार तक्रार.

  • कॉल सेंटरद्वारे मदतीची विनंती करता येणार.

  • महिला प्रवाशांच्या संरक्षणाशी संबंधित अनेक बाबींचा समावेश.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT