Banastarim Accident Case: ‘चालक कोण’चा गुंता अखेर असा सुटला !

Banastarim Accident Case: बाणस्तारी अपघात : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या न्यायवैद्यक विभागाची कामगिरी
Banastarim Mercedes Accident
Banastarim Mercedes Accident Dainik Gomantak

Banastarim Accident Case: बाणस्तारी अपघात प्रकरण हे एखाद्या हिन्दी चित्रपटाच्या पटकथेला शोभेल अशाच थाटात आतापर्यंत पुढे आले आहे. गोव्यातील प्रख्यात वकिलांचे डावपेच विरुद्ध गोवा पोलिस असे ते अप्रत्यक्ष द्वंद्व होते. तिघांपैकी नेमका चालक कोण हा वकिलांना न्यायालयात हवा असलेला संभ्रम बऱ्यापैकी तयार झाला होता.

Banastarim Mercedes Accident
Goa Unity Mall: ‘युनिटी मॉल’मुळे खारफुटी धोक्‍यात !

अशा वेळी गोवा पोलिस यातून कशी काय वाट काढतील, यावर संपूर्ण गोव्याचे लक्ष होते. अखेर, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या न्यायवैद्यक विभागाने अगदी शास्त्रीय पद्धतीने गुंता सोडविणारा अहवाल देऊन एक प्रकारे गोवा पोलिसांना सुटकेचा श्वास घेण्यास वाट मोकळी करून दिली आहे.

जेव्हा तोतया चालकाला संशयित म्हणून म्हार्दोळ पोलिसांकडे आणले तेव्हा त्याची आरोपी म्हणून नोंद न करून घेता आधी वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. एवद्या मोठ्या आपघातात अंगावर एकही जखम नाही हे लक्षात येताच, पोलिसांनी तोतयाला आपला खाक्या दाखवला व पहिला डाव फसला. याप्रकरणी मागाहून पोलिसांनी गुन्हेही नोंदवले आहेत.

तोतयेगिरी कबूल केल्यावर परेश सावर्डेकर याला अपघातग्रस्त कारचा चालक म्हणून अटक केली तर तो चालक नसून त्याची पत्नी गाडी चालवत होती, असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. अशावेळी पत्नी मेघनाला आरोपी की साक्षीदार म्हणावे, असा प्रश्न पोलिसांना पडला होता.

नेमका चालक कोण हा, संभ्रम असतानाच अपघातावेळी वाहनातील सर्वांना तपासणीला पाठवा, जखमांच्या खुणावरून कोण कुठे बसला असेल याचा अहवाल देऊ. याच शेऱ्याच्या आधारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मेघनाला मुलासह वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात बोलविले. परिणामी पोलिस तपासास हुलकावणी देऊन संभ्रम कायम ठेवण्याचे कावे फसले.

न्यायवैद्यक विभागाच्या विशेष तपासणीत परेश सावर्डेकर हाच अपघातग्रस्त मर्सिडिजचा चालक होता, याचा न्यायविश्वासक पुरावा पोलिसांना मिळाला. त्याआधी त्याला तीन तास शवागारात मृतदेह स्वीकारण्यासाठी थांबलेल्या नातेवाईकांसोबत बसवून ठेवून त्याची बदलणारी देहबोली पाहण्यात आली होती, अशीही माहिती मिळाली आहे.

सीटबेल्टमुळे जीव वाचले, तोच ठरणार पुरावा

अपघाताच्या वेळी गाडी इतकी वेगात होती की बाहेर ठोकर बसलेल्याचा एकतर मृत्यू झाला नाही तर जन्माचे अपंगत्व. अशावेळी केवळ सीटबेल्ट घातल्यामुळे आतील सर्वजण बचावले असे पोलिसांनी आधीच जाहीर केले होते. तसेच आतील सुरक्षा फुग्यांमुळे त्यांना गंभीर इजाही झाल्या नाहीत, असेही पंचनाम्यावेळी पोलिसांंच्या लक्षात आले होते. म्हार्दोळ पोलिसांनी डॉक्टरांकडे चर्चा केली तेव्हा सीटबेल्टच्या खुणा शरीरावर नक्की मिळणार, असे पोलिसांना कळले. प्रत्यक्ष तपासणीत तशा खुणा मिळाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com