DG of Police Mukesh Kumar Meena expressed view that Goa needs to be drug free  Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs : गोव्यात सहज उपलब्ध होणारे ड्रग्स धोक्याची घंटा!

किनारपट्टी घशात : पर्यटकच नव्‍हेत तर गोमंतकीय युवकही अंमलीपदार्थांच्‍या आहारी

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs : अभिनेत्री तथा भाजपा नेत्या सोनाली फोगट यांना कथितरित्या ड्रग्स पाजून मारण्‍याचे प्रकरण सध्या देशात चांगलेच चर्चेत आहे. दुसरीकडे, गोव्यात सहज उपलब्ध होणारे ड्रग्स आणि ड्रग्सचे सेवन करणाऱ्या तरुणाईसह लोकांचा वाढता टक्का ही मोठी चिंतेची बाब आहे. ही टक्केवारी भविष्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे संबंधित व्यवसनमुक्ती केंद्रात काम करणारे डॉक्टर तसेच प्रतिनिधी सांगतात. शिवाय कधीकाळी ड्रग्‍स प्रकरणात पर्यटक अधिक प्रमाणात आढळत असत. परंतु आता गोमंतकीय तरुणही मोठ्या प्रामाणात व्‍यसनाच्‍या आहारी जात आहेत.

अलीकडे कोणते ना कोणते व्यसन असणे हे एक ‘स्टेटस’ बनल्याने अनेकजण याकडे वळताहेत. रेव्ह पार्ट्या आणि मादक पदार्थांचा वाढता वापर आदी प्रकारामुळे ड्रग्‍सचा व्यापारही वाढीस लागल्याची माहिती समोर येत आहे. अमलीपदार्थ पसरण्यामागे प्रचंड मोठे अर्थकारण आणि राजकारण आहे. या ड्रग्सच्या सेवनाने दूरगामी, खोलवर परिणाम होताहेत. वाढत्या व्यसनाधिनतेमागे जीवनशैलीत झालेले बदल, आधुनिकतेचे वारे, पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव आदी कारणे आहेत. कुटुंबातील दुर्मीळ होत चाललेला संवाद हे प्रमुख कारण आहे. सुरूवातीला अनेकजण फक्त मौजमजा म्हणून एखाद्या ठराविक व्यवसनाकडे वळतात, मात्र ही मजा व्यसन होऊन बसते. शिवाय अनेकदा मित्रमंडळींचा सहवास वाढतो, मात्र कोणते मित्र चांगले अथवा वाईट ही पारख नसल्याने संगतीच्या परिणामांनी नकळतच अमलीपदार्थांचा फेरा घट्ट बनतो.

बार्देशातील किनारी भागांत कथितरित्या अमलीपदार्थांचे व्यवहार होतात, असे वेळोवेळी पोलिसी कारवाईनंतर दिसले आहे. त्यासोबतच, मोठमोठ्या ठिकाणी इव्हेंटमध्ये हे अमलीपदार्थ कथित पार्टीत आणले जातात. याची माहिती अनेकदा पोलिसांना असते, परंतु दरवेळी कारवाई होतेच असे नाही. दुसरीकडे, ड्रग्सच्या विळख्यात अडकलेले लोक हे अधिक निष्काळजी होतात. त्यांचे स्वतःकडे लक्ष नसते. व्यसनात गुरफटलेली व्यक्ती ही एकांत राहणे पसंत करते. कुटुंबीय, नातेवाईकांपासून दूर राहणे त्यांना आवडते. त्यांच्या हालचालींमध्ये शिथिलता येते. यातील काहीजण ड्रग्सच्या व्यसनातून बाहेर पडण्यास बघतात. पण ते त्‍यांना जमत नाही.

पालकांचे मुलांकडे हवे बारीक लक्ष

  • किशोरवयीन विद्यार्थी मौजमजा म्हणून ड्रग्सच्या आहारी जातात. अंमलीपदार्थांची सहज उपलब्धी हे समाजासाठी धोक्याचे संकेत व मोठे आव्‍हान.

  • ड्रग्सच्या तस्करीवर नियंत्रण आल्याशिवाय यावर लगाम लावता येत नाही. विद्यार्थी वर्गाकडून पॉकेटमनी तसेच पार्ट-टाईम जॉबमधून मिळणाऱ्या पैशांतून ड्रग्सची खरेदी-विक्री.

  • मुलांमध्ये गैरसमज असतात की, ड्रग्सच्या सेवनाने काहीच होत नाही. मी कुठलीही स्थिती हाताळू शकतो. परंतु, ते विषवल्लीत अडकून स्वतःचे जीवन संपवत असतात.

  • व्यसनमुक्ती केंद्रात येणारे रुग्ण हे ठराविक वर्गाचे नसून, सर्व वर्गातील असतात.

व्यसनमुक्ती केंद्र महत्वाचे

म्हापशातील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात ड्रग्स ट्रिटमेंट क्लिनिकची (डीटीसी) सुविधा आहे. इथे येणारे रुग्ण हे अधिकतर दारू तसेच हेरोईन, कोकेन यांसारख्या अमलीपदार्थांचे व्यसनाधीन असतात. सुरूवातीला मौजमस्ती म्हणून ते याच्या आहारी जातात. कालांतराने, हे त्यांचे व्यसन बनते. ड्रग्स हे शरीर तसेच मेंदूवर परिणाम करते. अनेकजण ड्रग्स सोडू पाहतात, मात्र ते त्‍यांना जमत नाही.

दरम्यान गोव्यात ड्रग्जप्रकरणी गेल्या 7 महिन्यात 62 गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत 67 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये 16 स्थानिक, 38 बिगरगोमंतकीय आणि 13 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 98 किलो ड्रग्स हस्तगत करण्‍यात आले असून त्‍याची आंतरराष्‍ट्रीय बाजारातील किंमत अडीच कोटी रुपये इतकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT