Goa News | Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : परप्रांतीयांचा ड्रग्स तस्करीत मोठा हात! उत्तर प्रदेशचा युवक पेडणे पोलिसांच्या ताब्यात

गोव्यात ड्रग्सतस्करी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Drugs Case : गोव्यात ड्रग्सतस्करी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर आळा घालण्यासाठी गोवा पोलीस प्रशासन, अबकारी खाते आणि सरकार प्रयत्नशील आहे. अमली पदार्थ विरोधी पथक विविध ठिकाणी सापळे रचून या गुन्हेगारांना अटक करत आहे. अशीच धडक कारवाई करत पोलिसांनी गांजा बाळगल्याप्रकरणी उत्तर प्रदेशच्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

मालपे रेल्वे स्थानकाजवळ पेडणे पोलिसांनी सापळा रचत उत्तर प्रदेशच्या ब्रिजेश रामदेव (21) याला अटक केली आहे. त्याच्याकडून 2.50 लाखांचा 2.410 किलोचा गांजा जप्त करण्यात आला आहे.

तो हा गांजा कस्टमरलाच द्यायला आला असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने मूळचा झारखंडचा रहिवासी असलेल्या विजय वर्मा याला करमाळी रेल्वे स्टेशनजवळून ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, विजय वर्मा याच्याकडून 3 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तो हा गांजा त्याच्या कस्टमरला देण्यासाठीच गोव्यात आला असल्याचे त्याने सांगितले. पोलीस या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'मतदारांना विचारूनच भाजपमध्ये आलो'; निलेश काब्राल यांच्या टीकेला रोहन खंवटे यांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

IND vs AUS: गोव्याच्या 18 वर्षीय व्यंकटचे युवा वनडे पदार्पण दिमाखात; ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या विजयात घेतली कर्णधाराची महत्त्वाची विकेट

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'चा जबर दणका! पाक एअरफोर्सचा एअरबेस अजूनही कोमात; सॅटेलाइट कॅमेऱ्यानं पकडली पाकड्यांची चोरी

CCTV Mandatory in medical: औषध दुकानांवर आता सीसीटीव्हीची नजर! H, H-1 आणि X औषधांच्या विक्रीवर नियंत्रणासाठी केंद्राचा मोठा प्रस्ताव

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावर अपघात, पाणी साचण्याच्या समस्येवर 'आप'चा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT