Goa Crime News: झारखंडमधून कस्टमरला ड्रग्स द्यायला गोव्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला...

मली पदार्थ विरोधी पथकाने मूळचा झारखंडचा रहिवासी असलेल्या विजय वर्मा याला करमाळी रेल्वे स्टेशनजवळून ताब्यात घेतले आहे.
Crime News |Goa Drugs News
Crime News |Goa Drugs NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drugs News: ड्रग्सतस्करी करण्यासाठी गुन्हेगार गोव्यात दाखल होऊन अवैध गोष्टी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोवा पोलीस, अबकारी खाते आणि सरकारतर्फे या गोष्टींवर आळा घालण्यासाठी विविध मोहिमा राबवण्यात येत आहेत.

Crime News |Goa Drugs News
Fire In Goa: आगोंद-केरी येथील पॉलिहाऊसला आग लागून 33 लाखांचे नुकसान

काल रात्री पोलिसांनी ड्रग्सतस्करी केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने मूळचा झारखंडचा रहिवासी असलेल्या विजय वर्मा याला करमाळी रेल्वे स्टेशनजवळून ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, विजय वर्मा याच्याकडून 3 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तो हा गांजा त्याच्या कस्टमरला देण्यासाठीच गोव्यात आला असल्याचे त्याने सांगितले. पोलीस या संपूर्ण घटनेचा पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, बेळगाव अबकारी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल 47 लाख रूपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. जाम्बोती- खानापूर मार्गावर मंगळवारी दुपारी अबकारी पथकाने छापा टाकत ही कारवाई केली.

धक्कादायक म्हणजे कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मद्याची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Crime And Social Concerns
Goa FDA Food Inspection
Panaji Cocaine Seizure Case
Sai Krishna Custody Death Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com