Court Dainik Gomantak
गोवा

Goa Court Order: कोर्टाच्या आदेशालाही जुमानत नव्हता ड्रग्ज प्रकरणातील संशयित; जामिन फेटाळला, पोलिसांनी केली अटक

Goa Drugs Case: आरोपपत्रावरील सुनावणीवेळी तो न्यायालयात उपस्थित राहत नव्हता. त्यामुळे अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने जारी केल्यावर त्याला २५ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक करून न्यायालयात उभे करण्यात आले होते.

Sameer Panditrao

पणजी: ड्रग्जप्रकरणी सशर्त जामिनावरील संशयित सेल्विन गौंडर याला आरोप निश्‍चितीच्या सुनावणीला उपस्थित न राहिल्याने तीनवेळा अटक वॉरंट बजावण्यात आले होते, तरीही तो हजर राहत नसल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. त्याने पुन्हा जामिनासाठी केलेला अर्ज मेरशी अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला.

यापूर्वी दिलेल्या जामिनाच्या शर्थींचे उल्लंघन केल्याने तसेच त्याची वर्तणूक योग्य नसल्याने मीन फेटाळण्यात येत असल्याचे निरीक्षण केले आहे. साळगाव पोलिसांनी संशयित सेल्विन गौंडर याला २०२० साली ड्रग्जप्रकरणी अटक केली होती. तपास करून त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला होता.

त्याची आई हमीदार राहिली होती. त्याच्या आरोपपत्रावरील सुनावणीवेळी तो न्यायालयात उपस्थित राहत नव्हता. त्यामुळे अजामीनपात्र वॉरंट न्यायालयाने जारी केल्यावर त्याला २५ ऑक्टोबर २०२३ रोजी अटक करून न्यायालयात उभे करण्यात आले होते. त्यानंतरही तो दोनवेळा सुनावणीस आलाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT