Dr.Soumya Swaminathan Dainik Gomantak
गोवा

कोरोना नियमांचे उल्लंघन करणे हा 'मूर्खपणा'

डॉ. सौम्या स्वामिनाथन : साथ संपल्याची घोषणा करणे चुकीचे

दैनिक गोमन्तक

जीनिव्हा: कोरोनाची साथ येऊन दोन वर्ष होऊन असून जगातील सर्व देश त्यातून बाहेर पडण्याची धडपड करीत आहे. ही साथ कधी संपुष्टात येईल, याचा अंदाज कोणीही व्यक्त करू शकेल, असे मला वाटत नाही. ही साथ संपल्याचा दावा अनेकजण करीत आहेत, पण अशी घोषणा कोणी करू नये. कोरोनाला रोखण्यासाठीचे नियम न पाळणे मूर्खपणाचे होईल. सर्व खबरदारी अद्याप घेणे आवश्‍यक आहे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) प्रमुख डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिला.

‘ब्लूमबर्ग क्विकटेक’च्या ‘एम्मा बार्नेट मिट्स’ या कार्यक्रमास स्वामिनाथन यांनी मुलाखत घेण्यात आली होती. तिचे प्रसारण शुक्रवारी करण्यात आले. कोरोनासाथीमुळे निर्माण झालेली स्थिती 2022 च्या अखेरीस परिस्थिती सुधारलेली असेल, अशी आशा आहे. विषाणूचे नवे प्रकार कोठेही उद्‍भवू शकतात आणि आपण फिरून पुन्हा त्यात ठिकाणी येऊ शकतो. म्हणूनच सावधगिरी बाळगायला हवी, असे त्याम्हणाल्या.

वटवाघळांमधून उत्पत्ती

स्वामिनाथन म्हणाल्या, ‘‘नव्याने निर्माण होणारे बहुतेक सर्व विषाणूजन्य आजार हे प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरणाऱ्या संसर्गामुळे होतात. एचआयव्ही, झिका, इबोला, सार्स, मर्स सह दोन प्रमुख कोरोना विषाणूंचा मानवाला झालेला संसर्ग आदींचा यात समावेश होते. कोरोनाच्या बाबतीत सर्व जनुकीय आराखड्याचे निर्देश वटवाघळांतून उत्पत्ती झाली याकडे आहे.’’ मात्र विषाणूचा हा संसर्ग प्राण्यांपासून मानवात कसा, कधी व कोठे संक्रमित झाला याचा शोध लागलेला नाही. भविष्यातील साथरोग रोखण्यासाठी हे समजणे महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

डॉ. स्वामिनाथन म्हणाल्या...

कोरोना साथीचे प्राथमिक कारण न समजणे ही मोठी गोष्ट नाही. यापूर्वी आलेल्या साथींमध्येही विषाणूंची उत्पत्ती कशी झाली हे समजण्यास अनेक वर्षे लागली. उदा. ‘सार्स’चा उगम सिवेट मांजरांपासून आणि ‘मर्स’चा उगम उंटामधून झाला हे समजण्यास खूप वर्षे गेली. ‘एचआयव्ही’चे (HIV) केंद्रस्थान चिंपाझी असल्याचेही अनेक वर्षांनंतर लक्षात आले.

कोरोनाची साथ येऊन दोन वर्ष होऊन असून जगातील सर्व देश त्यातून बाहेर पडण्याची धडपड करीत आहे. पण शास्त्रज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांसमोरील आव्हान अद्याप कायम आहे.कोरोनाच्या साथीचा उगम कोठून झाला हे ठरविण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे आणि ‘डब्लूएचओ’ (WHO) साठी जागतिक समर्थन मिळविणे, असा मोठा पल्ला गाठायचा आहे.

उगम चीनमधून शक्य

कोरोनाचा उगम चीनमधील वुहान विषाणूविज्ञान संस्थेतून झाल्याचा एक मतप्रवाह आहे. यावर बोलताना स्वामिनाथन म्हणाल्या की, कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही. यासंबंधीचे पुरावे व चीनला भेट दिलेल्या ज्या शास्‍त्रज्ञांनी कोरोनाचा प्रसार प्राण्यांपासून झाला, असे दावा केला आहे, त्यातील तथ्य तपासायला हवे. पण हा विषाणू वन्यजीव, पक्षी किंवा वटवाघळांमधून आला याची कल्पना आपल्याला नाही. यासंबंधात चीनबद्दलची माहिती पडताळून घ्यावी लागेल आणि अजून अभ्यासही करावा लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT