Driving Licence  Dainik Gomantak
गोवा

Driving Licence : लायसन्‍स आता ‘आरटीओ’शिवाय; चाचणीची सक्ती नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Driving Licence :

पणजी, नवीन वाहनचालक परवान्यासाठी वाहतूक खात्याकडे चाचणी देण्याची सक्ती नाही. ड्रायव्हिंग लायसन्सचा नवा नियम येत्या १ जूनपासून लागू होणार आहे व त्यासंदर्भात नियमांमध्ये मोठे बदल वाहतूक व महामार्ग मंत्रालयामार्फत केले जाणार आहेत.

या नव्या नियमांमुळे आता वाहतूक खात्याकडे जाण्याची गरज भासणार नाही. नवीन चालक परवाने राज्य वाहतूक खात्याने अधिसूचित केलेल्या मान्यताप्राप्त खासगी वाहन प्रशिक्षण संस्थेकडून मिळवता येतील.

गोव्यात अशा खासगी संस्था सध्या तरी नसल्याने तूर्त नवीन वाहनचालक परवान्यासाठीचा नियम लागू करणे शक्य नसल्याची माहिती वाहतूक खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या नव्या नियमांनुसार वाहनचालक परवान्यासाठी अनेक बदल लागू केले आहेत. वाहतूक खात्याकडून या परवान्यासाठी चाचणी घेण्याची सध्याची सक्ती रद्द केली जाणार आहे.

परवान्यासाठी अर्ज केलेली व्यक्ती त्याच्या आवडीच्या जवळच्या संस्थेत जाऊन वाहन चालवण्याची चाचणी देऊ शकेल. वाहतूक खाते खासगी संस्थेला वाहनचालक परवाना देण्याची मान्यता देऊन अधिकृत प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देणार आहे. वैध परवान्याशिवाय वाहन चालवल्यास मोठा दंड आकारला जाईल. अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालवताना आढळल्यास, पालकांवर कारवाई करताना २५ हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसे वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्रही रद्द केले जाणार आहे.

चालक परवाना मिळवण्यास आवश्‍यक असलेली कागदपत्रे मिळवणे देखील सुलभ केले जाणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही पूर्वीसारखीच असेल. मात्र नवीन वाहनचालक परवान्यासाठी वाहतूक खात्याकडे जाऊन चाचणी देण्याऐवजी मान्यताप्राप्त खासगी प्रशिक्षण संस्था हा पर्याय असेल.

संस्था सुरू करण्यासाठी नियम

वाहनचालक प्रशिक्षण संस्थेकडे चारचाकी प्रशिक्षणासाठी २ एकर व हलक्या वाहनांसाठी १ एक जमीन असावी.

प्रशिक्षकांकडे डिप्लोमा, किमान ५ वर्षांचा अनुभव, बायोमेट्रिक्स आणि आयटी सिस्टमशी परिचित असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी हलक्या वाहनांसाठी ४ आठवडे असावा. त्यामध्ये २९ तास प्रशिक्षण असेल. ८ तास वर्ग अभ्यास व २१ तास प्रॅक्‍टिकल. जड वाहनांसाठी ६ आठवडे प्रशिक्षण. त्यामध्ये ३८ तास प्रशिक्षण, ८ तास वर्ग अभ्यास तर ३१ तास प्रॅक्‍टिकल.

गोव्‍यात सध्‍या तरी अंमलबजावणी कठीण

मान्यताप्राप्त खासगी वाहन प्रशिक्षण संस्थेकडून नवीन वाहन चालवण्याचा परवाना घेण्याची सुविधा केंद्रीय मोटारवाहन कायद्यातील नियमांमध्ये आहे. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही अंमलबजावणी येत्या १ जूनपासून देशात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गोव्यात सध्‍या तरी ते कठीणच आहे. मंत्रालयाकडून या नव्या नियमांबाबतचा कोणताच पत्रव्यवहार झालेला नाही, अशी माहिती खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

'गोवा पोलिस' अंमलीपदार्थांविरोधी गंभीर! 'कोकेन जप्ती'प्रकरणी दिल्ली पोलिसांना करणार सहकार्य

Quelossim: ही तर नौटंकी! केळशीची बदनामी केल्याचा व्हेंझी यांच्‍यावर सरपंचांचा आरोप

Sunburn Festival 2024: धार्मिक स्थळी 'असले' कार्यक्रम नकोच! 'सनबर्न' साठीच्या सभेनंतर ग्रामस्थ ठरवणार दिशा

Israel-Iran War: इस्रायल-इराण युद्धानं सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार! भारतासह जगभरातील देशांना बसणार फटका

SCROLL FOR NEXT