Drishti lifesavers rescue a calf from drowning at Patnem beach in South Goa Dainik Gomantak
गोवा

Patnem Beach in South Goa: पाटणे किनाऱ्यावर भटक्या कुत्र्यांपासून वाचण्यासाठी वासरू शिरले समुद्रात

Drishti Lifesavers: दक्षिण गोव्यातील पाटणे समुद्रकिनाऱ्यावर ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी वासराला बुडण्यापासून वाचवले

गोमन्तक डिजिटल टीम

Patnem Beach in South Goa: दक्षिण गोव्यातील पाटणे समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी झालेल्या बचावकार्यात ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांनी एका वासराला बुडण्यापासून वाचवले. हे वासरू पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकले होते. सोमवार, १७ रोजी दुपारी १ वाजता ही घटना घडली.

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून वाचण्याकरिता घाबरून हे वासरू पाण्यात पळाले आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ते आत खेचले गेले.

वासरू पाण्याच्या प्रवाहात धडपडत असल्याचे पाहून जीवरक्षक मनोज भट आणि कुशांत नाईक यांनी त्वरित हस्तक्षेप करून त्या वासरूला किनाऱ्यावर आणले आणि किनाऱ्याच्या ५०० मीटर अंतरावर सुरक्षितपणे ठेवण्यात आले.

जीवरक्षकांना माणसाला वाचवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. एखादे जनावर तेही भर समुद्रात हाताळणे कठीण असते. भीतीपोटी ते जनावर माणसाला जवळ येऊ देत नाही. असे असतानाही वासराला किनाऱ्यावर सुखरूपपणे आणण्याची कसरत जीवरक्षकांनी केली आहे. यामुळे एका वासराचा जीव वाचू शकला आहे.

कुत्र्यांचा उपद्रव वाढला

किनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी अनेकांना याआधी चावा घेतलेला आहे. ‘दृष्टी’च्या जीवरक्षकांच्या अधिकाऱ्यालाही या कुत्र्यांनी सोडले नाही. पर्यटकही कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता वासराचा पाठलाग भटक्या कुत्र्यांनी केल्यानिमित्ताने किनाऱ्यावरील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT