Goa Drishti Lifeguard Dainik Gomantak
गोवा

‘दृष्टी’कडून 6 महिन्यांत 218 जणांना जीवदान

233 घटनांत बचावकार्य : पर्यटकांना खवळलेल्या समुद्रात न जाण्याची सूचना

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर नियुक्त केलेली जीवनरक्षक आणि बचाव संस्था, दृष्टीच्या जीवरक्षक पथकाने या वर्षी आतापर्यंत 218 जणांचे प्राण वाचवले आहेत. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत 223 वेगवेगळ्या घटनांद्वारे 218 बचावकार्य केली आहेत. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असताना राज्‍यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असून समुद्रात न जाण्याची सूचना ‘दृष्टी’कडून करण्यात आली आहे.

गेल्या सहा महिन्यांत एकूण 2007 मध्ये एकूण 400 हून अधिक बुडण्याच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करून कार्यक्षम यंत्रणा तैनात केली. दृष्टीने राज्यात 2008 मध्ये काम सुरू केले होते. या सेवेमुळे बुडून मृत्यूंमध्ये 99 टक्के घट झाली आहे. दृष्टी जीवरक्षकांच्या बचाव कार्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत सहा हजाराहून अधिक जीव वाचले आहेत.

घटना घडल्या होत्या, ज्यात पाण्यावर आधारित बचाव, प्रथमोपचार आणि वैद्यकीय आपत्कालीन घटनांचा समावेश आहे. यापैकी अनेक दुहेरी आणि तिहेरी बचाव होते. या घटनेदरम्यान एकूण 218 लोकांना वाचवण्यात आले, तर 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, अशी माहिती दृष्टीने पत्रकद्वारे दिली आहे.

(Drishti Lifeguard Goa saves 218 lives in 6 months)

मे महिन्यात सर्वाधिक 63 बचावकार्य नोंदवले गेले, त्यानंतर जानेवारीमध्ये 53 आणि फेब्रुवारीमध्ये 35 वाचवण्यात आले आहेत.या घटनांमधील एकूण व्यक्तींपैकी 287 भारतीय नागरिक होते. यात स्थानिकांचाही समावेश आहे. तर, वर्षभरात आतापर्यंत 9 विदेशींचे प्राण वाचवले आहेत. 26 ते 35 वयोगटातील एकूण 86 जणांचा समावेश आहे.

75 लोक 19 ते 25 वयोगटातील होते. तर, 55 लोक 12 वर्षाखालील होते.दृष्टीच्या जीवरक्षक पथकाकडून किनारपट्टीवरील कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला प्रथम प्राधान्य दिले जाते. गेल्या सहा महिन्यांमध्ये 48 लोकांना सुरक्षेसाठी मदत करण्यात आली होती. तर, समुद्रकिनाऱ्यांवर 20 लोकांना प्राथमिक उपचार देण्यात आले, असे पत्रकात स्पष्ट केले आहे.

कळंगुटमध्ये या वर्षी सर्वाधिक अनुचित घटना घडल्या आहेत. आतापर्यंत येथे 106 घटनांची नोंद झाली आहे, त्यानंतर बागा येथे 45, कांदोळीमध्ये 13 आणि वागातोरमध्ये 14 घटना घडल्या आहेत. दरम्यान, हरमलमध्ये 16 घटना आणि मोरजीमध्ये 14 घटना घडल्या आहेत. दक्षिण गोव्यात कोलवा येथे 14 आणि पाळोळेत 17 घटनांची नोंद झाली आहे.

आजवर 6 हजार जणांचे वाचवले जीव !

2007 मध्ये एकूण 400 हून अधिक बुडण्याच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे राज्य सरकारने त्वरित उपाययोजना करून कार्यक्षम यंत्रणा तैनात केली. दृष्टीने राज्यात 2008 मध्ये काम सुरू केले होते. या सेवेमुळे बुडून मृत्यूंमध्ये 99 टक्के घट झाली आहे. दृष्टी जीवरक्षकांच्या बचाव कार्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत सहा हजाराहून अधिक जीव वाचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT