ऑगस्टच्या प्रारंभी राज्यात मराठी चित्रपट महोत्सव; 22 सिनेमांची पर्वणी

अशोक सराफ यांना प्रतिष्ठित कृतज्ञता पुरस्कार जाहीर
Goa Marathi Film Festival
Goa Marathi Film FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कोविड निर्बंधामुळे गेली दोन वर्षे होवू न शकलेला 13 वा गोवा मराठी चित्रपट महोत्सव 5, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी पणजीत होत आहे. यावेळी तब्बल 22 चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे. तर यंदाचा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झाला. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल.

Goa Marathi Film Festival
भाजपच्या सोहळ्यात सभापती महोदय कशाला?

महोत्सवाबाबत माहिती देताना मुख्य आयोजक संजय शेट्ये यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की मुख्यमंत्री सावंत तसेच अभिनेत्री रविना टंडन यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्‍घाटन 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वा. आयनॉक्स येथे होणार आहे. चित्रपटांचे खेळ जुन्या जीएमसी कॉम्प्लेक्स येथील आयनॉक्स आणि मॅक्निझ पॅलेस येथे आयोजित करण्यात आले आहेत.

राज्यातील चित्रपट रसिकांपर्यंत सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच राहिला आहे आणि त्याला नेहमीच उदंड प्रतिसाद मिळाला आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, यंदा काही महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण चित्रपटांचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. पत्रकार परिषदेला उदय म्हांबरे सचिन चाटे, श्रीपाद शेट्ये, श्रद्धा पाटील उपस्थित होते.

22 चित्रपटांची पर्वणी

यावेळी अनंत महादेवनच्या कडू गॉड (बिटरस्वीट) गोदावरी, पोत्रा, कारखानीसांची वारी, तिचं शहर होण, संजय जाधव यांचा तमाशा लाईव्ह, मृणाल कुलकर्णीचा सहेला रे, सचिन कुंडलकरचा पाँडिचेरी, गजेंद्र अहिरे यांचा गोदाकाठ, सुहृद गोडबोलेचा जून, निपुण धर्माधिकारी यांचा मी वसंतराव, गोव्याची निर्मिती असलेला प्रतिष्ठित बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर झालेला स्थळ पुराण अशा अनेक चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे.

कलाकारांची मांदियाळी

महोत्सावाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, नेहा पेंडसे, सई ताम्हणकर, अमेय वाघ, किशोर कदम, मृण्मयी गोडबोले, संजय जाधव, सुहरुद गोडबोले, सचिन कुंडलकर, आदित्य सरपोतदार, अनंत महादेवन, प्रसाद ओक, गजेंद्र अहिरे अशा अनेक कलाकारांची उपस्थिती असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com