DRI Seize Drugs Dainik Gomantak
गोवा

DRI Seize Drugs : कोट्यवधींच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी गोवा, दिल्लीतील तिघांना अटक; डीआरआयची कारवाई

Rajat Sawant

DRI arrested 3 persons involved in drug smuggling : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) हेरॉईनच्या तस्करी करणाऱ्या तिघांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून सुमारे कोट्यवधी रुपयांच्या 5.2 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका नायजेरियन नागरिकाचा (Nigerian national), गोव्यातील एका महिलेचा आणि दिल्लीत एकाचा अशा 3 जणांना अटक केली आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या अंमली (Drugs) पदार्थांची किंमत 36 कोटींहून अधिक असू शकते.

याबाबत एका कस्टम अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणातील पहिली अटक शनिवारी दिल्ली विमानतळावर करण्यात आली. डीआरआय मुख्यालय आणि डीआरआय बेंगळुरू यांना 29 जुलैला आंतरराष्ट्रीय ड्रग स्मगलिंग रॅकेटबद्दल (international drug racket) विशिष्ट माहिती मिळाली.

गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआयच्या अधिकार्‍यांनी एका भारतीय नागरिकाला शनिवारी मलावीहून आदिस अबाबा मार्गे आल्यानंतर दिल्ली विमानतळावर (Delhi airport) रोखले. यावेळी तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना त्या प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये दोन वेगवेगळ्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेले सुमारे 5.2 किलो वजनाचे हेरॉईन सापडले. डीआरआयच्या अधिकार्‍यांनी हे हेरॉईन जप्त केले.

पुढे चौकशीत असे आढळून आले की, हा भारतीय नागरिक प्रवासी एका महिलेला हे हेरॉईन पोहोचवण्यासाठी गोव्याला जाणार होता. या माहितीच्या आधारे गोव्यातील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला होता व महिलेला ताब्यात घेण्यात आले. ही महिला हेरॉईन ताब्यात घेण्यासाठी सकाळी हैदराबादहून गोव्याला आली होती.

महिलेची अधिक चौकशी केली असता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला नायजेरियन नागरिकाला हे हेरॉईन पोहोचवण्यासाठी दिल्लीला जाणार होती. त्यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिल्ली गाठून नायजेरियन मास्टरमाइंडला अटक केली. याबाबतचे वृत्त रिपब्लिकवर्ल्ड या वृत्तसंस्थेने दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT