Sanjaya Baru  X
गोवा

Sanjaya Baru: 1991 साल, रुपयाची घसरण, राजीव गांधींच्या संजय बारूंनी जागवल्या आठवणी! मनमोहन सिंग यांच्या बुद्धिमत्तेबद्दल म्हणाले की.....

Patrakar programme at International Centre Goa: १९९०-९१ च्या काळात सक्रिय पत्रकार असलेल्या बारू यांनी भारतीय रुपयाची घसरण, भारतातील शिल्लक रक्कम संकट, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या आणि सोव्हिएत युनियनचे पतन यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या अनेक घटनांची आठवण करून दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjaya Baru Patrakar programme at International Centre Goa

पणजी: ज्येष्ठ पत्रकार आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे मीडिया सल्लागार डॉ. संजय बारू यांनी १९९१ हे भारताच्या इतिहासातील ऐतिहासिक वर्ष असल्याचे मत व्यक्त केले.

गुरुवारी संध्याकाळी इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे आयोजित ‘पत्रकार’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयोजित चर्चासत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजचे कम्युनिकेशन्सचे समूह प्रमुख रोहित बन्सल हे देखील उपस्थित होते. आयसीजीचे संचालक पुष्कर यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

१९९०-९१ च्या काळात सक्रिय पत्रकार असलेल्या बारू यांनी भारतीय रुपयाची घसरण, भारतातील शिल्लक रक्कम संकट, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या आणि सोव्हिएत युनियनचे पतन यासह देशाला हादरवून सोडणाऱ्या अनेक घटनांची आठवण करून दिली. त्यांनी पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगात सुरू केलेल्या आमूलाग्र बदलांवर प्रकाश टाकला. 

एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेबद्दल बोलताना बारू म्हणाले, २००८ च्या आंतरराष्ट्रीय आर्थिक संकटादरम्यान, भारतीय पंतप्रधानांना सलग तीन, जी २० पंतप्रधान शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले गेले. परिषदेत त्यांनी एका शिक्षकाप्रमाणे भूमिका पार पाडली.

डॉ. सिंग यांच्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात असलेल्या मोकळ्या वातावरणाचाही बारू यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, मला आठवते की आरएसएसच्या मुखपत्राच्या संपादकाला पंतप्रधानांची मुलाखत घेण्याची परवानगी दिली होती. पंतप्रधान कार्यालय टीकेसाठीही खुले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arijit Singh Retirement: मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का, अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला रामराम; पोस्ट करत म्हणाला, "मी आतापासून..."

Harry Brook: 11 चौकार, 9 षटकार... हॅरी ब्रुकनं 29 चेंडूत कुटल्या 90 धावा; श्रीलंकेच्या गोलंदाजांना धुतलं Watch Video

Goa to Nepal on Electric Bike: गोव्याच्या पोरांची कमाल! 'इलेक्ट्रिक बाईक'वरून गाठलं थेट 'नेपाळ'; 3,300 किमीचा थरार

UGC New Rules: "जातीवरुन कोणाशीही भेदभाव होणार नाही!", युजीसीच्या नवीन 'समानता' नियमावलीवर शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं VIDEO

KL Rahul Retirement: ''मनात संन्यास घेण्याचा विचार..." केएल राहुल क्रिकेटला ठोकणार 'रामराम'? सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

SCROLL FOR NEXT