
Passion for Perfection Ramesh Sippy Philosophy Master Class At IFFI 2024
परिस्थितीनुसार कल्पकतेने काम करण्याची क्षमता चित्रपट दिग्दर्शकाकडे असायलाच हवी. शोलेच्या वेळी माझ्याकडे चांगली संहिता होती, चांगले कलाकार आणि चांगले तंत्रज्ञ होते तरीही आम्ही सारे मिळून अधिक चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करत होतो. एकदा वातावरण ढगाळ असल्यामुळे दोन दिवस आम्ही शूट न करता थांबलो होतो परंतु मी नंतर माझ्या मनात असा आला की हे वातावरणच त्या विशिष्ट दृश्याला अधिक परिणामकारक बनवू शकेल. इफ्फीमधील मास्टर क्लासमध्ये ‘फॅशन फॉर परफेक्शन: रमेश सिप्पीज फिलॉसॉफी’ या विषयावर सत्र पार पडले.
नंतर ते दृश्य आम्ही त्या वातावरणातच शूट केले आणि त्याचा परिणाम देखील आम्हाला चांगला मिळाला. शूट सुरू होण्यापूर्वी माझ्या कॅमेरामनने संशय व्यक्त केला तेव्हा मी त्याला म्हणालो होतो, ‘अब ऐसे सोचा है तो ऐसा ही करेंगे’. जेव्हा तुम्ही कल्पकतेने विचार करतात तेव्हा वातावरण देखील तुम्हाला मदत करते. काही वेळा तुम्ही तुमच्या प्रेरणांवर विश्वास ठेवला पाहिजे.
माझ्या काळातली सिनेमा निर्मिती आणि आजची सिनेमा निर्मिती यात खूप फरक आहे. बजेटिंगचे सारेच तंत्र आज बदलले आहे. माझ्या काळी एक सिनेमा पूर्ण होण्यासाठी खूप काळ लागत असे. आज या क्षेत्रात भरपूर पैसा आहे आणि सिनेमाही लवकर पूर्ण होतो. आज हे क्षेत्र कॉर्पोरेट प्रणित बनले आहे त्यामुळे काम नियोजनपूर्वक केले जाते.
त्याशिवाय ‘स्पेशल इफेक्ट्स’नी सिनेमा निर्मितीत नवीन आयाम निर्माण केले आहेत. सिनेमा हे विकसित होणारे विज्ञान आहे व त्या विज्ञानानुसार आपण चालले पाहिजे. पूर्वीचा काळ चांगलाच होता पण आजचा काळही चांगलाच आहे. सिनेमा निर्मितीचे प्रत्येक युग आपल्या परीने सुंदरच होते. या महोत्सवात मी फाळके यांनी बनवलेली 105 वर्षांपूर्वीची एक फिल्म पाहिली. प्रगत तंत्रज्ञान नसताना ती त्या काळात कशी बनली असेल याचे मला आश्चर्य वाटते.
प्रत्येक पिढीतील लोक वेगळ्या जगात राहत असतात. तंत्र कितीही प्रगत झाले तरी त्या माध्यमाची महत्त्वाची पायाभूत तत्वे मात्र तशीच राहतात. आज एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)चे युग असले तरी त्याचा बाऊ न करता, ते आपल्या मदतीसाठी आहे ही गोष्ट आपण ओळखली पाहिजे. तंत्रज्ञानाची अद्भुतता ओळखून तिचा स्वीकार करा. शिकणे हे महत्त्वाचे आहे. अर्थात, आपण वेगवेगळ्या प्रकारे शिकू शकतो. मी स्वतः फिल्म स्टुडिओमध्ये होणारे काम पाहत किंवा स्वतः काम करत शिकलो आहे. फिल्म इन्स्टिट्यूटचा उदय होण्याआधीही सिनेमा बनत होता. शिक्षण हे महत्त्वाचे आहेत पण त्याचा प्रत्यक्ष वापर करणे हे अधिक महत्त्वाचे असते.
मला काळ किंवा क्षणच प्रेरणा देत आले आहेत. एके दिवशी, एका कडाक्याच्या थंडीत, जोरदार वारा चालू असताना एक कचरा उचलणारी बाई वाऱ्याशी झगडून कचरा गोळा करताना मी पाहिले. कचरा वाऱ्यामुळे इतस्ततः उडत होता पण ती बाई हार मानत नव्हती. शेवटी थंडी-वार्याशी झगडून तिने तो सारा कचरा गोळा केलाच. हा माझ्यासाठी एक धडा होता. आपण कुठलाही परिस्थितीत हार मानता कामा नये हे मी त्या क्षणी शिकलो. जर चुकांपासून शिकण्याची तयारी असेल तर चुका केल्या तर चालतील कारण ते भविष्यात स्वतःला विकसित करण्यासाठी असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.