Rabies Vaccination  Dainik gomantak
गोवा

Goa Rabies Death: गोव्यात रेबीजमुळे एकाचा मृत्यू! महाराष्ट्र अन् कर्नाटकातून धोका? सत्तरी, डिचोलीसह पेडण्यात...

Rabies Goa: २०२३ साली रेबीज विषाणू आढळून आलेल्या व्यक्तींना वेळीच योग्य ते उपचार न घेतल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. २०१७ नंतर रेबीजमुळे मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सीमावर्ती तालुक्यांमध्ये ६ प्राणी आणि एका व्यक्तीत रेबीज आढळून आला. २०२३ साली रेबीज विषाणू आढळून आलेल्या व्यक्तींना वेळीच योग्य ते उपचार न घेतल्याने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. २०१७ नंतर रेबीजमुळे मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.

गोव्यात रेबीज बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. परंतु शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावर्ती गावात रेबीजची लागण झालेली कुत्री आहेत. त्यामुळे सीमेलगत असलेल्या सत्तरी, डिचोली, पेडणे तालुक्यात रेबीज नियंत्रणासाठी अधिक लक्ष्य दिले पाहिजे. तसेच परराज्यातून गोव्यात येणाऱ्या श्‍वानांचे लसीकरण करणे गरजेचे आहे, सीमावर्ती भागात त्यांचे लसीकरण झाले, तर रेबीजची लागण राज्यातील कुत्र्यांना होणार नाही, असे मिशन रेबीजचे संचालक डॉ. मुरूगन अपुपिल्लई यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

जागतिक रेबीज दिनानिमित्त गोव्यात रेबीज नियंत्रणासाठी कोणती उपाय योजना केल्या जात आहेत त्याबाबत जाणून घेण्यात आले. गोव्यासारख्या लहान राज्यात सुमारे दीड लाख भटकी कुत्री आहेत. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु ही भटकी कुत्री कमी करण्यासाठी ग्रामपंचायत आणि नगरपालिकांची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांनी देखील उघड्यावर, कचऱ्यात अन्न टाकू नये, असे प्रकार कमी झाले नाहीत तर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढेल, जी सर्वांसाठीच घातक आहे. आपल्या देशात कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे डॉ. अपुपिल्लई यांनी सांगितले.

मायक्रोचीप बसवणार!

आम्ही राज्यातील पाळीव कुत्र्यांना मायक्रोचीप बसवत आहोत. राजधानी पणजीतील सुमारे ८०० कुत्र्यांना मायक्रोचीप बसविण्यात आले असून येत्या ऑक्टोबर महिन्यात बाणावलीत कुत्र्यांना हे मायक्रोचीप बसविण्यात येणार आहे. या चीपमुळे आपण कुत्र्यांची सविस्तर माहिती, त्याचे लसीकरण केले आहे की नाही याची सविस्तर माहिती स्कॅन केल्यावर कळून येते. जर आपला कुत्रा हरविला तर त्याला शोधण्यास देखील हे मायक्रोचीप लाभदायी आहे. त्यामुळे येत्या काळात कुत्र्यांना बसविण्यात येणारे मायक्रोचीप महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे डॉ. अपुपिल्लई यांनी सांगितले.

विविध स्पर्धा

डॉ. अपुपिल्लई म्हणाले, पुढील महिनाभर मिशन रेबीज अंतर्गत मोठ्या प्रमाणात राज्यातील कुत्र्यांचे लसीकरण करणार आहे. त्यासोबतच रेबीजविषयी सर्वसामान्यांना माहिती मिळावी, जागृती व्हावी, यासाठी विविध स्पर्धा, जनजागृती कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT