Goa Rabies Death: राज्यात 5 वर्षांत रेबीजमुळे झाले 'इतके' मृत्यू; 2017 पासून राज्यात किती रूग्ण आहेत जाणून घ्या...

गोव्यात रेबीजची लस, रेबीज इम्युनोग्लोब्युलिन प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपलब्ध
Goa Rabies Death
Goa Rabies DeathDainik Gomantak

Goa Rabies Death: गोव्यात गेल्या पाच वर्षांत मानवी रेबीज मृत्यूची पहिली घटना नोंदवली गेली आहे. सप्टेंबर 2017 पासून राज्यात मानवाला रेबीज झाल्याचे एकही उदाहरण नव्हते. एकही रुग्णही आढळला नाही.

तथापि, सप्टेंबर 2023 मध्ये उत्तर गोव्यात मानवी रेबीज पॉझिटिव्ह प्रकरणाची नोंद झाली आणि या रुग्णाचा GMC येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आरोग्य सेवा संचालनालयाने (DHS) ही माहिती दिली आहे.

दरम्यान, रुग्णाचा तपशील उघड करता येणार नाही, असेही असे राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम (NRCP) नोडल अधिकारी डॉ. प्रशांत सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा संचालनालयाच्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि कर्नाटक लगतच्या तालुक्यांमध्ये रेबीजची प्रकरणे वाढत आहेत आणि गोव्यातून काही कुत्र्यांचे रेबीज पॉझिटिव्ह प्रकरणे समोर येत आहेत.

Goa Rabies Death
Goa Gold Smuggling: गोवा पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राज्यातील विमानतळांवरील सोने तस्करीत हात

सूर्यवंशी म्हणाले की, एकूण मानवी रेबीज प्रकरणांपैकी 96-97 टक्के कुत्रा चावल्यामुळे, 2 टक्के मांजर चावल्यामुळे आणि इतर प्राण्यांच्या चाव्याव्दारे रेबिज झाल्याची उदाहरणे 1 टक्के आहेत. रेबीज हा जगातील एकमेव असा आजार आहे जो 100 टक्के प्राणघातक आणि 100 टक्के टाळता येण्याजोगा आहे.

त्यामुळे एक्सपोजर प्रोफाईल ऍक्सेस देऊन रेबिजला प्रतिबंध करणे आपल्या हातात आहे. ज्यामध्ये आम्ही सर्व चाव्यांवर रेबीज इम्युनोग्लोब्युलिन प्रदान करत आहोत. तसेच अँटी रेबीज लसीकरण देखील देत आहोत.

Goa Rabies Death
Goa Accident: गोव्यात नववर्षाच्या प्रारंभीच अपघातात 4 जण ठार; स्मार्टसिटीच्या कामात एकाचा मृत्यू

काय काळजी घ्यावी...

कुत्रा चावल्यानंतर लगेच 15 मिनिटे वाहत्या पाण्याखाली जखमेला साबणाने धुणे आणि अँटी-रेबीज लसीकरणाचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे हे रोग रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.

लस

गोव्यात रेबीजची लस आणि रेबीज इम्युनोग्लोब्युलिन अगदी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com