Ambedkar Jayanti 2023 Dainik Gomantak
गोवा

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यात उत्साहात साजरी

राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन

Rajat Sawant

Ambedkar Jayanti 2023: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभरात तसेच राज्यात उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

पणजी पाटो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. सावंत, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित होते.

यावेळी आंबेडकरांची प्रेरणा घेऊन कार्यरत असलेल्या चौघा जणांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय समाजकल्याण मंत्रालयातर्फे विविध शिष्यवृत्तींचे वाटप आणि इतर काही जणांचे सन्मानही झाले.

यापुढील काळात आंबेडकर जयंती राज्याचा सोहळा म्हणून साजरी केली जाईल तसेच लवकरात लवकर पुढच्या वर्षभरात आंबेडकर भवन बांधणार. या भवनात पेडण्यापासून ते काणकोणपर्यंतचे जे विद्यार्थी शिक्षणासाठी येणार आहेत, त्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोयही येथील हॉस्टेलमध्ये करण्याचे नियोजन आहे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजीतील भाजप कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गावकरवाडा, पिसुर्ले येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

मुरगाव भाजपचे आमदार संकल्प आमोणकर यांनीही मुरगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. "ज्या महान व्यक्तीने संविधान लिहिले, प्रत्येकजण त्याचे पालन करतो, त्यामुळेच भारत शांत आणि प्रगती करत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनीही पेडणेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

गोवा प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.

नेहरू युवा केंद्र पणजी व युथ हॉस्टेल पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्गचे माजी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Nehru Yuva Kendra Panaji

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

Bhai Dooj 2025: '7 रंगांचे तिलक, न कोमेजणारा हार'; नेपाळमध्ये कशी साजरी होते भाऊबीज? जाणून घ्या आगळीवेगळी प्रथा..

Horoscope: आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढतील; घरातील पूजनात सहभागी व्हा

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT