Amit Palekar AAP Goa Dainik Gomantak
गोवा

Railway Track Doubling: 'विरोध करण्याची धमक भाजप सरकारात नाही'! रेल्वेमार्गावरून 'आप'चा घणाघात; चेहऱ्यावर काळे पट्टे ओढून विरोध

Amit Palekar AAP Goa: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विरोध केला होता, विरोध करण्याची धमक राज्यातील सध्याच्‍या भाजप सरकारात नाही, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केली.

Sameer Panditrao

पणजी: दक्षिण गोव्यात निर्माण होणारा आणि कर्नाटक हद्दीतून तयार करण्यात आलेला दुहेरी रेल्वेमार्ग हा अदानी समूहाच्या कोळसा वाहतुकीसाठीच आहे, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. या दुहेरी रेल्वेमार्गाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विरोध केला होता. तसा विरोध करण्याची धमक राज्यातील सध्याच्‍या भाजप सरकारात नाही, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी केली.

पक्षाच्या कार्यालयात आज मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पालेकर बोलत होते. याप्रसंगी सरचिटणीस (प्रचार) संदेश तळेकर देसाई आणि वास्कोचे नेते सुनील लोरान उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरवातीला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुहेरी रेल्वेमार्गाला विरोध केला होता, ती व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली.

त्यानंतर पालेकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्र्यांचे शब्द विसरले आहेत. कोळसा वाहतूक करणाऱ्या खासगी कंपन्यांसाठी हा दुहेरी रेल्वे मार्ग आहे. विशेषत: अदानी समूहासाठी हा मार्ग असून, राज्य सरकामध्‍ये हे रेल्वेचे काम बंद करण्यात दम नाही.

चेहऱ्यावर ओढले काळे पट्टे

राजकीय मतभेद विसरून या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. आम्हीही त्यांच्याबरोबर सोबत येऊ, असे पालेकर म्‍हणाले. दुहेरी मार्गामुळे दोन हजार घरे स्थलांतरीत होणार आहेत. शिवाय मोठ्या प्रमाणात जमीन संपादित होणार आहे. दरम्‍यान, आज आम आदमी पक्षाने या विषयावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ‘आप’चे अमित पालेकर व इतर नेत्यांनी चेहऱ्यावर काळे पट्टे ओढले होते. त्‍यामुळे ही पत्रकार परिषद कोळशाविरोधात आहे, हे प्रतिबिंबीत होत होते.

कोळसा वाहतुकीमुळे आरोग्य धोक्‍यात

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून रेल्वे मार्ग दुपदरीकरणाला पाठींबा दर्शविला आहे. मात्र या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा नाश होईल आणि कोळशाच्या वाहतुकीमुळे गोमंतकीयांच्या आरोग्याला गंभीर धोके निर्माण होतील, असा इशारा आम आदमी पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनी दिला. पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोरकर म्हणाले की, गोव्याचे भविष्य, पर्यावरण आणि आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी आम्ही गावपातळीवर जाऊन जनजागृती करणार आहोत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अद्याप या प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, ती त्यांनी लवकर स्पष्ट करावी. गोव्याच्या हितासाठी आमचा या प्रकल्पाला कायम ठाम विरोध राहील. राज्यात दिवसेंदिवस फुफ्फुसाचे आजार आणि कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, असेहीं त्‍यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''बान तू सायबा'', भूतनाथाला रानातून परत आणण्यासाठी भाविक जमणार; पेडण्यात भरणार 'पुनव उत्सव'

U19 Goa Cricket Team: गोवा संघाचा लागणार कस! विनू मांकड करंडक होणार सुरु; युवा क्रिकेटपटू चमक दाखवण्यासाठी सज्ज

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

SCROLL FOR NEXT