CM Pramod Sawant: Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: विकासकामांचा पैसा गटारांत घालवू नका!

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री: कचरा व्यवस्थापनात हरवळे आदर्श

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: पंचायतींनी आपला निधी केवळ गटारांसाठी वाया न घालवता गावात नवीन विकासांचे स्रोत आणण्यासाठी वापरावा. दूरदृष्टी बाळगून गावाचा विकास कसा करता येईल, नवीन तंत्रज्ञानाचा वापर समस्या सोडवण्यासाठी कसा होईल, याचा विचार पंचायतींनी करावा.

कचरा व्यवस्थापनाबाबत हरवळे या अत्यंत लहान पंचायतीचा आदर्श गोव्यातील इतर पंचायतींनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

हरवळे पंचायतीने उभारलेल्या ‘एमआरएफ’ या कचरा व्यवस्थापन शेड, गावठी बाजार शेडचे उदघाटन व गावातील स्वावलंबी व्यावसायिकांच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत

सदस्य गोपाळ सुर्लकर, नगराध्यक्षा रश्मी देसाई, श्रीनिवास राव कलाकुंटला, सरपंच अंकुश मळीक, उपसरपंच ममता दिवकर, स्वयंपूर्ण मित्र सतीश वाघोणकर, गटविकास अधिकारी ओमकार मांद्रेकर, पंचसदस्य नंदिनी गावस, संजय नाईक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी गोपाळ सुर्लकर, रश्मी देसाई यांनीही विचार व्यक्त केले. स्वागत पंचसदस्य संजय नाईक यांनी केले.

...तर प्रशस्त इमारत असती

हरवळेतील लोकांनी पंचायतीसाठी हट्ट धरून ती साकारण्याचा संकल्प सार्थ ठरविला आहे. राज्यात सर्वांत लहान असलेल्या या पंचायत क्षेत्रात आज सर्व आवश्यक साधनसुविधा आहेत; परंतु स्वतःची पंचायत इमारत नाही. जर गावातील लोकांनी सामाजिक जबाबदारी ओळखून जागा दिली असती तर या पंचायतीची प्रशस्त इमारत उभी राहिली असती, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT