Morjim Public Shri Durga Samiti Dainik Gomantak
गोवा

आकाश कंदीलाकडे स्पर्धा म्हणून पाहू नका ; नगरसेवक तारक आरोलकर

भारतीय संस्कृतीचे दर्शन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात दिसुन येते

दैनिक गोमन्तक

आपल्याला आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आणि तेही मंदिरात दिसुन येते, आकाश कंदील म्हणून त्या स्पर्धेकडे पाहू नका ती आपली संस्कृती आहे तिचे जतन कण्यासाठी अश्या स्पर्धेच अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन म्हापसा नगरसेवक वकील तारक आरोलकर (Corporator Tarak Arolkar) यांनी मोरजी सार्वजनिक श्री दुर्गा उत्सव (Morjim Public Shri Durga Samiti) समितीतर्फे पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उद्योजक बाबी बागकर, दत्तात्रय देवस्थान अध्यक्ष रंजेश कासकर, रवी हरमलकर, रमेश फडते, संतोष गोवेकर, नागनाथ केरकर दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर कानायिक, संतोष कारापूरकर, सोनू शेटगावकर, मनीषा बागकर, श्रुती केरकर, प्रसाद बागकर सतीश च्यारी, परीक्षक सुचिता शिरोडकर, यतीश म्हादळेकर आदी उपस्थित होते.

स्वागत व सूत्रसंचालन सतीश च्यारी यांनी केले. तर अंतरा केरकर, सिमी केरकर, सुजल हरमलकर, आचल, आदींनी पाहुण्याचे गुलाब देवून स्वागत केले.

यावेळी उद्योजक बाबी बागकर यांनी बोलताना श्री दुर्गा उत्सव समितीने अल्पावधीत केलेल्या कार्याला तोड नाही. कोरोना काळात उत्सव समितीने केलेले कार्य कुणीही विसरू शकत नाही, सामाजिक बांधिलकी ओळखून कार्य करणाऱ्या संस्था समाजाचे दुख ओळखून काम करतात ते लोकांच्या गळ्यातील ताईत बनतात असे बागकर म्हणाले.

उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर कान्नायिक यांनी आता पर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला.

यावेळी पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धेचे विजेते प्रथम विवेक गावडे, यतीन शेट्ये दुसरे, व दुर्वी शेटगावकर याना तिसरे बक्षीस तर तनिष नाईक, उमेश येशी, श्रीरंग मांद्रेकर, विदिशा शेटगावकर,व अविना शेटगावकर याना उत्तजनार्थ बक्षीस देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT