पथदीपाअभावी गेली कित्येक वर्षे काळोखात असलेली गावकरवाडा-बोर्डे (Borde) येथील लोकवस्ती आता प्रकाशमय झाली आहे. समाजसेवक तथा शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत शेट्ये (Dr. Chandrakant Shetty) यांनी या लोकवस्तीजवळ स्वखर्चाने सौर ऊर्जेवरील (Solar power) पथदीप उभारलेला आहे.
दिवाळीचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या पथदीपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक मेधा बोर्डेकर (Medha Bordekar) आणि नारायण बेतकीकर (Narayan Betkikar) तसेच जयेंद्रनाथ गोवेकर (Jayendranath Govekar), कुष्टलो पळ, बापू विठ्ठल पळ, गणेश कृष्णा पळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
संघटितपणे डिचोलीचा विकास आणि डिचोली (Bicholim) प्रकाशमय करूया. असे आवाहन डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी यावेळी बोलताना केले. सूत्रसंचालन विजय बोर्डेकर यांनी केले. पथदीपाची सोय नसल्याने गावकरवाडा-बोर्डे येथील लोकवस्तीजवळ रात्रीच्यावेळी मोठी समस्या निर्माण होत असे. सौर ऊर्जेवरील पथदीपामुळे आता ही समस्या दूर झाल्याने कुष्टलो पळ आणि अन्य ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.