Traffic Advisory For Tourist In Goa Dainik Gomantak
गोवा

ड्रिंक अँड ड्राईव्ह करु नका, हेल्मेट घाला; गोव्यात आलेल्या पर्यटकांसाठी पोलिसांची नियमावली, पालन न केल्यास होणार कारवाई

Traffic Advisory For Tourist In Goa: अपघाताची वाढती संख्या, खबरदारीचा उपाय म्हणून गोवा पोलिसांच्या वाहतूक खात्याने नियमावली जाहीर केली आहे.

Pramod Yadav

Traffic Advisory For Tourist In Goa

पणजी: गोव्यात सनबर्न, थर्टी फर्स्ट आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर देशी - विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. राज्यात पर्यटकांची वर्दळ वाढल्याने अनेक मुख्य ठिकाणे आणि प्रमुख मार्गावर गर्दी पाहायला मिळत आहे. अशात अपघातांची शक्यता देखील वाढली असून, पोलिसांनी राज्यातील पर्यटकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. तसेच, या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेली नियमावली खालीलप्रमाणे

१) वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन धारकांनी वाहने चालवावीत

२) दुचाकी चालकांसाठी हेल्मेटचा वापर बंधनकारक आहे.

३) जबाबदारपणे आणि सुरक्षित ड्रायव्हिंग करा.

४) वाहन चालवताना मोबाईलचा वापर करु नका

५) दारु पिऊन वाहन चालवू नका

६) वाहन पार्क करताना, पार्किंग नियमाचे पालन करा. तसेच, नियमित केलेल्या पार्किंग जागेत पार्किंग करा. बेशिस्तपणे पार्किंग करु नये.

७) वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.

गोव्यात गेल्या आठवड्यात विविध अपघातात सहा ते सात जणांचा बळी गेला आहे. तसेच, दोन अपघातात ट्रक थेट घरांवर जाऊन धडकल्याची घटना उघडकीस आली आहे. राज्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने प्रमुख रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढलीय, तसेच प्रमुख पर्यटन स्थळांवर गर्दीत वाढ झाली.

अशात अपघाताच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून गोवा पोलिसांच्या वाहतूक खात्याने नियमावली जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT