Calangute FDA Raid: फुड स्टॉलवर मिळाले ई-सिगारेट; कळंगुट - बागा येथे FDA टीमकडून झाडाझडती

Calangute FDA Surprise Inspection: पर्यटन हंगाम सुरु असल्याने अमली पदार्थाची तस्करी, मद्य यासह विविध गैरप्रकारांवर पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे.
Calangute FDA Raid: फुड स्टॉलवर मिळाले ई-सिगारेट; कळंगुटमध्ये FDA टीमची झाडाझडती
FDA Official Inspecting Food Stall In CalanguteDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कळंगुट परिसरात झाडाझडती घेतली असता एका फुड स्टॉलवर प्रतिबंधित ई-सिगारेट सापडल्या. ऐन पर्यटन हंगामात राज्यात अमली पदार्थासह राज्यात येणाऱ्या नशेच्या विविध पदार्थांवर पोलिस आणि राज्य प्रशासन लक्ष ठेवून आहे. दरम्यान, सोमवारी कळंगुट परिसरात तपासात फुड स्टॉलवर ई- सिगारेट आढळून आल्या आहेत.

Found E-Cigarettes
Found E-CigarettesDainik Gomantak

काही दिवसांपूर्वी शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांनी शिवोलीसह, कळंगुट व वागातोर परिसरात मिळणाऱ्या ई-सिगारेट आणि वेपचा तपास घेऊन कारवाईची मागणी केली होती. अनेक ठिकाणी प्रतिबंधित ई-सिगारेट मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच, पोलिसांनी यात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

Calangute FDA Raid: फुड स्टॉलवर मिळाले ई-सिगारेट; कळंगुटमध्ये FDA टीमची झाडाझडती
Goa Tourism:'...यामुळे गोव्याची प्रतिमा डागाळली', हॉटेलमधील सुमार सेवेवरून पुणेकराचं CM सावंतांना खुले पत्र
Officer At Food Stall
Officer At Food StallDainik Gomantak

दरम्यान, राज्यात पर्यटन हंगाम सुरु असल्याने मोठ्या संख्येने देशी - विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. अशात अमली पदार्थाची तस्करी, मद्य यासह विविध गैरप्रकारांवर पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे. सोमवारी एफडीच्या अधिकाऱ्यांनी गजबजलेल्या कळंगुट - बागा भागात तपासणी केली असता फुड स्टॉलवर ई- सिगारेट सापडल्या. अधिकाऱ्यांनी सिगारेट जप्त केल्या असून, पुढील कारवाई सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com