Dr. Anupama Borkar  Dainik Gomantak
गोवा

Breast Cancer Precaution: ऐन तारुण्यात होऊ नका कर्करोगाची शिकार! डॉ. अनुपमा बोरकर

Breast Cancer Precaution: संजीवनी लाईफ बियॉन्ड कॅन्सरद्वारे आयोजित इंटरग्रेटीव्ह कॅन्सर केअरसंबंधी आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

गोमन्तक डिजिटल टीम

Breast Cancer Precaution

ज्यावेळी आपण ‘कर्करोग’ हा शब्द ऐकतो, त्यावेळी भीतीने अंगावर काटा येतो. काही काळापूर्वी स्तन कर्करोग पन्नाशीनंतर व्हायचा; परंतु मागील वीस वर्षांचा आढावा घेतल्यास स्तन कर्करोग कमी वयोमानात देखील होत आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. अनुपमा बोरकर यांनी दिली.

संजीवनी लाईफ बियॉन्ड कॅन्सरद्वारे आयोजित इंटरग्रेटीव्ह कॅन्सर केअरसंबंधी आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. डॉ. बोरकर म्हणाल्या की, गोमेकॉत २६ वर्षांची स्तन कर्करोग झालेली रुग्ण उपचार घेत आहे.

पूर्वी मायलोमा (कर्करोगाचा एक प्रकार) ६० वर्षांवरील रुग्णाला व्हायचा; परंतु आता ३५ वर्षांतच तो होत आहे. कर्करोग तरुण वयात होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, पाश्‍चिमात्य जीवनशैली असू शकते.

आपण जे अन्न सेवन करतो, ते स्थानिक असावे. जीवनशैली सुधारावी, दिवसातून किमान ४० मिनिटे व्यायाम करावा. मुख्य म्हणजे ताण कमी करणे गरजेचे असल्याचे डॉ. अनुपमा बोरकर यांनी सांगितले.

गोमेकॉत उपचार घेणाऱ्या रुग्णांत वाढ

गोमेकॉत वर्षभरात सुमारे तेराशे कर्करोग रुग्णांनी उपचार घेतले; परंतु या आकड्यांवरून राज्यात कर्करोग वाढतोय, असे म्हणता येणार नाही. कारण मागील अनेक वर्षांची आकडेवारी आपल्याकडे नाही.

त्यासोबतच कर्करोगासंबंधी आता जागृती वाढत असल्याने नागरिक उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढतेय का, याबाबत निश्‍चितपणाने सांगता येणार नाही; परंतु निश्‍चितपणे गोमेकॉत कर्करोगासंबंधी उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, असे बोरकर म्हणाल्या.

मानसिक आधार गरजेचा:

रुग्णांना सामाजिक, मानसिक आधारदेखील गरजेचा असतो, त्यासोबतच जे कर्करोगाशी झुंज देऊन रोगमुक्त झालेत, अशा व्यक्तींशी बोलल्यास त्यांना लढण्यासाठी बळ मिळते. यात सकारात्मकतेने सामोरे जाणे गरजेचे असल्याचे डॉ. बोरकर यांनी सांगितले.

राज्यात कर्करोगग्रस्तांची नोंदणी होत नाही; परंतु यावर्षी राज्यातील कर्करोग रुग्णांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्याद्वारे किती रुग्ण बरे झाले, तसेच इतर नोंदीही ठेवल्या जातील. त्याद्वारे पुढील पाच वर्षांचा अभ्यास करून रुग्णांच्या संख्येत वाढ होते की स्थिर आहे, अथवा रुग्ण घटतायेत हे सांगू शकू. यासाठी नोंदणी सुरू केली आहे.

- डॉ. अनुपमा बोरकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT