Don Bosco College of Engineering

 
Dainik Gomantak
गोवा

डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावर चार स्टार मानांकन

देशातील 268 संस्था, विद्यापीठे व 269 महाविद्यालयांना सर्वोच्च मानांकन मिळाले आहे त्यात डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (Don Bosco College of Engineering) अभिमानास्पद समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: फातोर्डा येथील डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Don Bosco College of Engineering) इनोव्हेशन कौन्सिलला (Innovation Council) राष्ट्रीय स्तरावर चार स्टार मानांकन मिळाले आहे. महाविद्यालयाच्या या कौन्सिलने राज्य व राष्ट्रीय स्तरावर 2020-2021 वर्षासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. गोमंतकीय महाविद्यालय स्तरावर या महाविद्यालयाला मिळालेले हे सर्वोच्च मानांकन आहे. देशातील 268 संस्था, विद्यापीठे व 269 महाविद्यालयांना सर्वोच्च मानांकन मिळाले आहे त्यात डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभिमानास्पद समावेश आहे.

2020-2021 वर्षात कौन्सिलतर्फे उद्योजकते संबंधीत अनेक कार्यशाळा. चर्चासत्रे, परिसंवाद आयोजित करण्यात आले. शिवाय नाविन्यपुर्ण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना कॅरिअल संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या.

या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इनोव्हेशन कौन्सिलचे डॉ. वर्षा तुरकर अध्यक्ष असुन डॉ. गौरंग पाटकर उपाध्यक्ष व मिशेल आरावजो निमंत्रक व संयोजक आहे. अविला नाईक, स्वप्निल रामाणी, डॉ. विवेक जोग, ऑसविन सुवारीश, सत्येश काकोडकर, सुरज मराठे, सेल्विन फर्नांडिस, नताशा डिसोझा, किम्बर्ली मोराईश व ग्रेबियन आलेमाव यांच्या अथक मेहनत व प्रयत्नांमुळे अनेक कार्यक्रम यशस्वी करण्यात आले.

शिवाय डी. एस प्रशांत, गजानन नगर्सेकर, मिलिंद अन्वेकर, शर्वन हेडगे, अॅड. शाआलिनी मिनेझीस सारख्या प्रतिष्ठीत व्यक्ती तसेच विविध कंपन्यांचे उच्चपदस्तांचा व विद्यार्थी प्रतिनिधींचा कोअर आयआयसी3.0 समितीमध्ये समावेश होता.

देशातील शैक्षणिक व्यवस्था अशी असावी जेणेकरुन विद्यार्थ्यांना उद्योजकतेमध्ये जागृत करणे शक्य होईल.डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाने त्या दृष्टिने पहिले पाऊल टाकले असल्याचे प्राचार्य डॉ. निना पाणंदीकर यानी सांगितले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी संचालक फा. किन्ले डिक्रुझ यांचे योगदान व सहकार्य मोलाचे ठरले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT