Dog terror in Mhardol Goa Dainik Gomantak
गोवा

म्हार्दोळ परिसरात कुत्र्यांची दहशत

म्हार्दोळ परिसरातील लोकांत घबराट पसरली आहे.

दैनिक गोमन्तक

मडकई : म्हार्दोळ परिसरात दोन कुत्र्यांनी दहशत माजवली असून दुचाकीवरून जाणाऱ्यांना चावे घेण्याचे प्रकार या दोन्ही कुत्र्यांनी चालवले असल्यामुळे परिसरातील लोकांत घबराट पसरली आहे. (Dog terror in Mhardol Goa)

म्हार्दोळ बाजार परिसरात एक, तर म्हार्दोळ - आकार परिसरात दुसऱ्या कुत्र्याने ही दहशत माजवली आहे. या कुत्र्यांचा संबंधितांनी त्वरित बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी म्हार्दोळ भागातील लोकांनी केली आहे.

राज्यात सध्या सगळीकडेच भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्यावेळी तर दुचाकीस्वार तसेच अन्य कुणी पडण्याची सोयच उरलेली नाही. रात्रीच्यावेळी ही भटकी कुत्री नेमका दुचाकीस्वार तसेच एकटादुकटा चालत जात असल्याचे दिसल्यानंतर सरळ त्याच्या मागे लागतात. त्यामुळे अपघातांचे सत्रच सध्या सुरू आहे.

दरम्यान, वेलिंग प्रियोळ कुंकळ्ये पंचायतीचे सरपंच रणजीत प्रभुदेसाई यांनी या प्रतिनिधीशी बोलताना कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पंचायत प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT