Diya Sawal Chess Player
Diya Sawal Chess PlayerDainik Gomantak

'बुद्धिबळात भारताचे प्रतिनिधित्व करायला आवडेल'

गोव्याच्या युवा बुद्धिबळपटूचे मनोगत, आंतराष्ट्रीय शालेय स्पर्धेसाठी पात्र
Published on

मडगाव : गोव्याची युवा प्रतिभाशाली बुद्धिबळपटू दिया सावळ हिने भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय बाळगले आहे. मेहनत घेण्याचे आणि चांगला खेळ करणे हेच आपले लक्ष्य असल्याचे तिने नमूद केले. हल्लीच दिया हिने भुवनेश्वर येथे राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत नऊ वर्षांखालील मुलींत सुवर्णपदक जिंकले. त्या पार्श्वभूमीवर मनोविकास प्राथमिक विद्यालयात शिकणाऱ्या या गुणवान बुद्धिबळपटूने पत्रकारांशी संवाद साधला.

‘‘राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा जिंकल्याचा अभिमान वाटत आहे. यापुढेही अशीच मेहनत घेणार आहे आणि यापेक्षा जास्त चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करीन,’’ असे दिया हिने आत्मविश्वासाने सांगितले. राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याने दिया आता आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरली आहे.

Diya Sawal Chess Player
Top 5 Goa News | गोंयच्यो 5 मुखेल खबरो (28th May 2022)

बुद्धिबळ महासंघाचे आभार

दिया हिची आई दिपाली सावळ यांनी आपल्या मुलीचे यश गौरवास्पद असल्याचे सांगितले. त्या मडगावच्या उपनगराध्यक्षही आहेत. दिपाली यांनी दिया हिचे प्रशिक्षक प्रकाश सिंग, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचेही आभार मानले. संघटना, महासंघातर्फे बुद्धिबळ खेळाडूंसाठी अनेक स्पर्धा आणि उपक्रम घेण्यात येतात, त्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन लाभते, असे दिपाली यांनी नमूद केले.

अव्वल खेळाडू बनण्याची दियात क्षमता

देशातील अव्वल बुद्धिबळपटू बनण्याची क्षमता दिया हिच्यात आहे, असा विश्वास तिचे प्रशिक्षक प्रकाश सिंग यांनी व्यक्त केला. साडेतीन-चार वर्षांची असल्यापासून दिया हिला प्रकाश यांचे बुद्धिबळ मार्गदर्शन लाभत आहे. मागील दोन वर्षांत ती भरपूर ऑनलाईप बुद्धिबळ खेळली. तिने अथक मेहनत घेत क्षमता सिद्ध केल्याचे प्रकाश यांनी नमूद केले. दिया हिने राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके, करंडक जिंकले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com