Mormugao Port Doc Workers Protest Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port Protest: मुरगाव बंदर कामगारांची जोरदार निदर्शने! वेतन कराराची त्वरित अंमलबजावणी करण्‍याची मागणी

Mormugao Port Doc Workers Protest: देशातील प्रमुख बंदरांतील सहा कामगार महासंघ व इंडियन पोर्ट असोसिएशनने गेल्या २७ सष्टेंबरला वेतन करारावर सह्या केल्या होत्या. या कराराची त्वरित अंमलबजावणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता दोन महिने उलटले तरी इंडियन पोर्ट असोसिएशनने सदर कराराची माहिती बंदर प्राधिकरणांना दिलेली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao Port Doc Workers Protest

वास्को: ‘दादागिरी नही चलेगी’, ‘हमारी माँगे पुरी करो’, ‘लाल बावटा झिंदाबाद’, ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देत मुरगाव बंदर कामगारांनी आज गुरुवारी परिसर दणाणून सोडला. वेतन कराराची त्वरित अंमलबजावणी करावी यासाठी सडा येथील मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीसमोर त्‍यांनी जोरदार निदर्शने केली.

गोवा बंदर व गोदी कामगार संघटनेचे अध्यक्ष अभय राणे, सरचिटणीस बाळकृष्ण फळदेसाई, मुरगाव बंदर व रेल्वे कामगार संघटनेचे सरचिटणीस क्रुझ मास्कारेन्हस, खजिनदार करीम मुल्ला यांनी कामगारांना मार्गदर्शन करून एकजुट ठेवण्याचे आवाहन केले.

देशातील प्रमुख बंदरांतील सहा कामगार महासंघ व इंडियन पोर्ट असोसिएशनने गेल्या २७ सष्टेंबरला वेतन करारावर सह्या केल्या होत्या. या कराराची त्वरित अंमलबजावणी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता दोन महिने उलटले तरी इंडियन पोर्ट असोसिएशनने सदर कराराची माहिती बंदर प्राधिकरणांना दिलेली नाही. त्यामुळे वेतन कराराची अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे.

गोवा बंदर व गोदी कामगार संघटनेचे अध्यक्ष अभय राणे, सरचिटणीस बाळकृष्ण फळदेसाई, सचिव वागो सुजारे, कार्यकारी अध्यक्ष स्नेहल नाईक, उपाध्यक्ष रवी लुईस, दिलीप नाईक, आगुस्तीन फर्नांडिस, तेजानंद अणसुरकर, उदय फडते तसेच इतर पदाधिकारी यावेळी उपस्‍थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र निदर्शने शांततेत झाली.

…तर १७ डिसेंबरपासून बेमुदत संपावर

येत्या १० डिसेंबरला मंगळवारी मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीसमोर निवृत्तवेतनधारक व त्यांचे कुटुंबीय एकत्र येऊन निदर्शने करणार आहेत. त्यांना मुरगाव बंदर कामगार पाठिंबा देणार आहेत. तसेच १५ डिसेंबरपर्यंत वेतन कराराची अंमलबजावणी न झाल्यास १७ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कामगारांनी घोषणा देऊन परिसर सोडला दणाणून

याप्रकरणी विविध कामगार महासंघांनी इंडियन पोर्ट असोसिएशनाला जबाबदार धरले आहे. तसेच विविध कामगार संघटनांसह आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २८ नोव्हेंबरला देशातील विविध बंदरांतील संबंधित अध्यक्षांना निवेदने देण्यात आली होती. आता पुन्हा लक्ष वेधण्यासाठी अज निदर्शने करण्‍यात आली. त्यानुसार मुरगाव बंदर कामगार दुपारी जेवणाच्या वेळेत सडा येथील मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या प्रशासकीय कार्यालय इमारतीसमोर जमा झाले व त्यांनी आपल्या मागण्यांबद्दल घोषणा दिल्या. त्‍यात गोवा बंदर व गोदी कामगार संघटना तसेच मुरगाव बंदर व रेल्वे कामगार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य कामगार सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT