Panaji Smart City Sandip Desai
गोवा

Panaji Smart City : पावसाळ्यात पणजी बुडवायचीय का?

‘स्‍मार्टसिटी’ची कामे अद्याप आटोक्‍यात नाहीत; खोदलेल्या रस्‍त्‍यांवर गटारांचे पाणी, नागरिक बेहाल

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्याची राजधानी असलेल्या सुंदर पणजी शहराचे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे सौंदर्यीकरण सोडाच परंतु विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. ज्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले होते, ते रस्ते पुन्हा उद्‍ध्वस्त करून सांडपाण्याचे नियोजन केले जात आहे.

अनेक ठिकाणी भयावह स्थिती आहे. या भोंगळ कारभाराला कोण जबाबदार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जर सांडपाणी किंवा इतर काही समस्या होत्या, तर रस्त्याचे डांबरीकरण का केले होते. जनतेच्या पैशांची अशा प्रकारची नासाडी कितपत योग्य आहे?

पणजीची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी संस्थानकडून मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते, आता याच ठिकाणी भररस्त्यात चार पाच ठिकाणी खोदकाम करून पुन्हा सांडपाणी व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. अशा प्रकारे जर स्मार्ट सिटीची भोंगळ कारभार सुरू राहिला तर पावसापूर्वी सोडाच परंतु पुढील वर्षभरात जरी काम संपवायचे म्हटले तरी होणार नाही, अशा प्रकारची या कामाची अवस्था झाली आहे.

आता केवळ जीव जाणे बाकी!

गेल्या दोन महिन्यात मालवाहतूक ट्रक रस्त्यात रुतण्याचे प्रकार कित्येकदा समोर आले. आजही अशीच एक घटना घडली आहे. पणजीतील सांतिनेज परिसरातील शीतल हॉटेलजवळ एक ट्रक रस्त्यात रुतून पूर्णपणे कलंडल्याने पुन्हा एकदा स्मार्ट सिटीच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

जवळपास महिन्याभरापूर्वी याच परिसरात, शीतल हॉटेलजवळच मालवाहतूक करणारा ट्रक रस्त्यात रुतला होता. पोलिस मुख्यालयासमोर अशा प्रकारची घटना घडली वारंवार अशा प्रकारच्या घटना होत असून काता केवळ जीव जायचा बाकी आहे. तेव्हाच कोठे प्रशासनाला जाग येईल, असे वाटत आहे.

पणजी शहरात स्मार्ट सिटीची कामे पाहता हा अनागोंदी कारभार चाललेला आहे. सांतिनेज येथे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असताना तेथील काम बंद ठेवण्यात आले आहे. यंदा पणजीत पावसाळ्यात काय स्थिती होईल त्याची कल्पना करवत नाही.

- उत्पल पर्रीकर, पणजी

स्मार्ट सिटीची कामांचे योग्य तऱ्हेने नियोजनच केलेले नाही त्यामुळे हा सगळा प्रकार सुरू आहे. पुढील महिन्याभरात ही कामे पूर्ण होतील असे वाटत नाही. २५ मे नंतर केव्हाही पाऊस पडू शकतो त्यामुळे यंदा पावसात पणजीला आणि पणजीकरांना निश्‍चितपणे धोका आहे.

- उदय मडकईकर, माजी महापौर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT