Hearty Brunch: गोव्यातील ही 4 कॅफे तुम्हाला माहिती आहेत का?  Instagram /@babaaurhumcafeanjuna
गोवा

Hearty Brunch: गोव्यातील हे 4 कॅफे तुम्हाला माहिती आहेत का?

गोव्यातील रेस्टॉरंट्स विविधी चवदार, स्वादिष्ट पदार्थ आणि पारंपारिक गोव्यातील खाद्यपदार्थांची मेजवानी देतात.

Puja Bonkile

गोव्यातील (Goa) प्रत्येक सकाळ ही रविवारच्या सकाळसारखी वाटते. कारण येथील वातावरण असे आहे. गोव्यात अनेक लोक सुट्यांचा आनंद घेण्यासाठी येतात. गोव्यात तुम्हाला अनेक कॅफे (Café) मिळतील. पण जर तुम्हाला ब्रंच (Hearty Brunch) करायचा असेल तर आम्ही तुम्हाला गोव्यातील काही खास कॅफेबद्दल माहिती देणार आहोत. गोव्यातील रेस्टॉरंट्स विविधी चवदार, स्वादिष्ट पदार्थ आणि पारंपारिक गोव्यातील खाद्य पदार्थ यांची मेजवानी देते. गोवा हे खरोखरचं विविध संस्कृतीचं हब आहे.

Baba Au Rhum, Anjuna

अंजूना बागच्या मागच्या रस्त्यावर वसलेले, बाबा ओ रम हे गोव्यातील दुपारची वेळ हॅंग आऊट करण्यासाठी योग्य जागा आहे. येथील सजावट आपल्याला एक वेगळाच अनुभव नक्की देतो. क्विच, ब्रेड, हॅम्बर्गर, होममेड बॅगेट्स, पेस्ट्री, ऑम्लेट, सॅलड्स, पिझ्झा, आणि विदेशी फ्रेंच पदार्थांचा आस्वाद या ठिकाणी घेत येईल. या कॅफेमधील कॉफी ही अनेक लोकाना आवडते. येथे तुम्हाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक खाद्यपदार्थांचा आनंद घेतांना दिसतील. रविवारी ते 'इलेक्ट्रिक संडे नावाने लाइव्ह परफॉर्मन्सही आयोजित करतात. येथील सुप्रीम बर्गर, अर्थ पिझ्झा, क्रोइसंट सँडविच, ब्रूड बिअर, व्हिएतनामी कॉफी, चॉकलेट क्रोइसंट या पदार्थांचा नक्की आस्वाद घ्यावा. हे कॅफे सीम वड्डो येथे आहे.

Artjuna Anjuna

अंजुनाच्या मध्यभागी असलेल्या आर्टजुनाने अलीकडेच्या वर्षात खूप ,ओकप्रियता मिळवली आहे. हे कॅफे त्याच्या शांतपूर्ण वातावरणासाठी, पुस्तकाच्या संग्रहासाठी, सुपर हेल्दी फूड सिलेक्शन आणि चैतन्यमय वतावरणासाठी ओळखले जाते. या कॅफेमध्ये दिले जाणारे पदार्थ समकालीन आहेत. विविध प्रकारच्या कॉफी, स्मूदी, शेक आणि अनेक पदार्थांचा आस्वाद घेत येतो. या कॅफेमध्ये इवेंट देखील आयोजित केले जातात ज्यामध्ये ते जगभरातील कलाकार सहभागी होतात.

Bean Me Up

व्हॅगेटोर येथे वसलेले बिन मी अप हे शाकाहारी लोकांसाठी स्वर्गच. तुम्ही शाकाहारी असाल तर ब्रंच (Hearty Brunch) घेण्यासाठी या कॅफेला नक्की जावू शकता. या कॅफेमध्ये संपूर्ण शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेता येईल. यामुळेच हे कॅफे शाकाहारी पदार्थासाठी गोव्यातील सर्वोत्तम ठिकाणापैकी एक बनले आहे.

Elephent Beach cafe

गोव्यात जर तुम्ही ब्रंच (Hearty Brunch) आणि काही लाइव्ह म्युझिक या दोघांचा आनंद घ्यायचा असेल तर अंजूना समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे एक विलक्षण कॅफे तुमच्यासाठी उत्तम ठिकाण आहे. येथे ग्रीक- शैलीतील अंतर्गत सजावट केलेली आहे. या कॅफेची सजावट येथे आलेल्या पर्यटकांना आकर्षित करते. या कॅफेमध्ये सुपर हेल्दीअशा विविध कॉन्टिनेंटल ब्रेकफास्टचा आस्वाद घेता येईल. एलिफंट बीच कॅफे कोल्डड्रिंकसाठी सर्वात आरोग्यदायी जागा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT