Goa POCSO Case Dainik Gomantak
गोवा

Goa POCSO Case: पोक्सो प्रकरणात 26 वर्षीय युवक निर्दोष; डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा पुरावा

Goa POCSO Case Acquittal: डीएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने पोक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गंभीर प्रकरणातून केपे येथील २६ वर्षीय युवकाची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: डीएनए चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्याने पोक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गंभीर प्रकरणातून केपे येथील २६ वर्षीय युवकाची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

युवकाविरोधात भारतीय न्याय संहिताचे कलम ६४ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. मार्च ते जून २०२५ दरम्यान कुडचडे येथील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये अल्पवयीन पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.

वेर्णा येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने (एफएसएल) सादर केलेला डीएनए अहवाल या खटल्यात मुख्य पुरावा ठरला. पीडित मुलगी गरोदर असल्याचे आढळल्यानंतर तिच्या गर्भाचे नमुने आणि संशयिताच्या डीएनएचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तपासणीत आरोपीचा डीएनए गर्भाशी जुळला नाही.

न्यायाधीश डॉ. पूजा कवळेकर यांनी निकालात नमूद केले की, आरोपीचा डीएनए गर्भाशी जुळत नाही. त्यामुळे आरोपी हा त्या गर्भाचा पिता नाही हे सिद्ध होते. त्यामुळे डीएनए पुराव्याचा विचार करता आरोपीविरोधात कोणताही आरोप सिद्ध होत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT