Diwali Faral In Marathi Dainik Gomantak
गोवा

Diwali 2024: गोव्याची दिवाळी एकदम खास्सम खास! घरबसल्या बनवा विविध प्रकारचे पोहे

Diwali Faral In Marathi: गोव्यातल्या पोह्यांची खास रेसिपी, तुम्ही घरबसल्या हे विविध प्रकारचे पोहे बनवून गोव्यातली दिवाळी साजरी करू शकता.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Diwali 2024

गोव्यातली दिवाळी ही खास करून तिथल्या अनोख्या खाद्यसंस्कृतीसाठी ओळखली जाते. कदाचित तुम्ही ऐकलं असेल गोव्यात एक नाही तर अनेक प्रकारचे पोहे बनवले जातात. पोहे म्हटलं की आपल्याला फोडणीचे पोहे आठवतात. बरोबर? पण आणखीन वेगळे पोहे म्हणजे काय? आणि ते कसे बनवावे याबद्दल कुतूहल निर्माण झालंय ना?

चला मग जाणून घेऊया गोव्यातल्या पोह्यांची खास रेसिपी,जेणेकरून तुम्ही घरबसल्या हेच विविध प्रकारचे पोहे बनवून गोव्यापासून दूर देखील गोव्यातली दिवाळी साजरी करू शकाल.

१) गुळाचे पोहे: (Goa Diwali)

गुळाच्या पोह्यांना तुम्ही गोड पोहे असं देखील म्हणू शकता. यासाठी गूळ, खोबरं, पोहे, मीठ, वेलची यांची गरज असते.

कृती: गुळाचे पोहे एकदम पटकन बनतात आणि तेवढेच चविष्ट सुद्धा लागतात. सर्वात आधी लाल पोहे धुवून घ्या. दुसऱ्या बाजूला गूळ, खोबरं आणि चवीनुसार मीठ घेऊन मिश्रण एकजीव करून घ्या. शेवटी मिश्रण आणि पोहे एकजीव करा.

आणखीन एक पद्धत वापरून देखील गुळाचे पोहे बनावता येतात, यासाठी गुळाचा पाक तयार करून त्यात चवीनुसार वेलची टाकून शेवटी पोहे घालून मिश्रण एकजीव करून घ्या, यामुळे पोहे खाताना गुळाचे खडे बाकी राहत नाहीत.

२) ताकतले पोहे:

दही किंवा ताकाचे पोहे बनवणं सुद्धा अगदीच सोपं आहे. यासाठी तुम्हाला ताक, मिरची, मीठ, पोहे, आलं, खोबरं यांची गरज असते.

कृती: ताकाचे पोहे बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे धुवून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला खोबरं, मिरच्या, आलं आणि मीठ एकत्र वाटून घ्या. शेवटी पोहे आणि हे मिश्रण एक करा आणि त्यात ताक किंवा दही घालून मिश्रण एकजीव करून पोहे तयार करा.

३) कढीचे पोहे:

तुम्हाला जर का तेल नको असेल तर पोहे बनवण्याचा आणखीन एक रुचकर पदार्थ गोव्यात चाखायला मिळतो आणि तो म्हणजे कढीचे पोहे. यासाठी तुम्हाला लाल मिरच्या, जिरं, लाल पोहे, हिंग, गूळ, चिंच आणि खोबऱ्याची गरज असते.

कृती: सर्वात आधी लाल मिरच्या आणि जिरं भाजून घ्या. पुढे यात पाव चमचा हिंग टाका, याला पोह्यांचा मसाला म्हणतात जो गार झाल्यानंतर वाटून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला पाव वाटी चिंचेचा कोळ तयार करा आणि त्यात अर्धी वाटी गूळ विरघळेपर्यंत मिक्स करा. यानंतर चवीनुसार तयार केलेला मसाला आणि मीठ टाकून मिश्रण ढवळून घ्या.

कढीचे पोहे (Kadhiche Pohe Goa Recipe) तयार करताना शक्यतो लाल पोहे वापरले जातात. आता तुम्हाला भिजवलेले लाल पोहे बनवलेल्या मिश्रणात एकजीव करायचे आहेत. हा पदार्थ गोव्यातला आहे आणि त्यामुळे नारळाचा रस त्यात आलाच पाहिजे, पोहे कायम मऊ राहावे म्हणून त्यात नारळाचा रस मिक्स करावा लागतो.

४) साधे पोहे:

पोह्यांचा हा प्रकार अत्यंत सोपा आहे. इथे तुम्हाला केवळ पोहे धुवून त्यात मिरची, मीठ आणि आलं एकत्र करून पोहे मस्त मळून घ्यायचे असतात. हे पोहे दह्यासोबत खायला भारीच रुचकर लागतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: नोकरी देण्याच्या आमिषाने 15 लाख लाटल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी अटकेत!

Dudhsagar Waterfall: पर्यटन हंगाम सुरळीत कर रे महाराजा! स्थानिकांकडून दूधसागर देवाला सामूहिक गाऱ्हाणे

Konkani Language: खरी गरज 'कोकणी भाषा विकास संस्थेची'! गोव्यातील भाषा तसेच परिषदेचा इतिहास

गोव्यात बँकांचं आडमुठं धोरण! पीएम रोजगार योजनेच्या कर्जांसाठी जीसीसीआयने सुचवल्या 'या' उपाययोना

Devendra Fadnavis: मुंबईचा कायपालट घडवण्यात फडणवीसांचं महत्वपूर्ण योगदान; परिवर्तनकारी प्रकल्पांना दिली चालना!

SCROLL FOR NEXT