Diwali 2024: यंदा दिवाळी कधी? वसुबारस ते भाऊबीज सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Diwali 2024 Calendar Dates: सलग चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात कोणत्या दिवशी कोणता सण साजरा करायचा?
Diwali 2024 Calendar Dates: सलग चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात कोणत्या दिवशी कोणता सण साजरा करायचा?
Diwali 2024 Calendar DatesDainik Gomantak
Published on
Updated on

Diwali Festival Dates 2024

पणजी: गोव्यात सध्या दिवाळीची लगबग सुरु झाली आहे. आकाशकंदील, दिवाळीचा फराळ आणि महत्वाचं म्हणजे नरकासुर बनवण्यात सर्वांचीच तारांबळ उडतेय. भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सवांना फार महत्व दिलं जातं आणि यांमध्ये चतुर्थी आणि दिवाळीची मजा तर फारच वेगळी असते. सलग चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात कोणत्या दिवशी कोणता सण साजरा करायचा हे आज जाणून घेऊया...

वसुबारस: (Vasubaras 2024)

गोव्यात वसुबारस आणि धनत्रयोदशी पासून दिवाळीची सुरुवात होते. अश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरा केला जाणार आहे.

धनत्रयोदशी:

अश्विन कृष्ण त्रयोदशीच्या संध्याकाळी घरोघरी आकाशकंदील लावले जातात, दिव्यांची रोषणाई केली जाते. सोबतच कारीट आणि झेंडूच्या फुलांच्या माळा बनवून पाण्याचा हंडा, विहीर आणि गोठ्याचं पूजन केलं जातं.

गुरुवारी २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशीची पूजा केली जाईल. यंदा धनत्रयोदशीची पूजा करण्यासाठी सकाळी १०:३० पासून मुहूर्त देण्यात आला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक आयुर्वेदिक डॉक्टर धन्वंतरीची पूजा (Dhanvantari Poojan) देखील करतात.

Diwali 2024 Calendar Dates: सलग चार ते पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात कोणत्या दिवशी कोणता सण साजरा करायचा?
Narkasur Making In Goa: गोव्यात दिवाळीची लगबग सुरु, नरकासुर तयारीने धरला जोर; गोमंतकीयांचा उत्साह शिगेला!

नरकचतुर्दशी/ दिवाळी: (Diwali 2024)

अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच गुरुवार ३० ऑक्टोबरला देशभरात दिवाळी किंवा नरकचतुर्दशी साजरी केली जाईल. गोव्यात नरकासुराची(Narkasur in Goa) खास परंपरा असल्याने याच दिवशी पहाटे नरकासुराच्या दहनाने सणाची सुरुवात होणार आहे. त्यांनतर अभ्यंगस्नान, श्रीकृष्ण पूजन, फराळ आणि इत्यादी गोष्टी पार पडल्या जातील.

लक्ष्मी पूजन: (laxmi Poojan Date)

यंदाच्या वर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त देण्यात आलाय, त्यामुळे शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी सर्वत्र लक्ष्मीपूजन केले जाईल. पंचांगानुसार लक्ष्मीपूजनाची शुभ वेळ संध्याकाळी ५:३६ ते ६:१६ अशी आहे. गोव्यात विशेषकरून व्यापारीवर्ग लक्ष्मीपूजा करतो.

पाडवा:

शनिवारी म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी देशात पाडवा (Diwali Padwa) साजरा केला जाणार आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा याला बली प्रतिपदा असं देखील म्हटलं जातं आणि हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. यादिवशी शेणाचा गोठा आणि गाईच्या पूजेला विशेष महत्व आहे. गोव्यात या दिवशी गाईला गुळाच्या पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो.

भाऊबीज:

दिवाळी सणाचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज (Bhaubeej in Marathi). कार्तिक शुद्ध द्वितीया किंवा यमद्वितीयेला साजरा केला जाणाऱ्या, बहीण-भावाचं नातं घट्ट करणाऱ्या या दिवसाचं महत्व फार आहे. रविवारी ३ नोव्हेंबर रोजी भाऊबीज साजरी केली जाणार आहे.

दिवाळीचे पौराणिक महत्व काय? (Significance of diwali)

पौराणिक आधारावर श्रीकृष्णाने नरकासुरावर विजय मिळवून सर्वांना त्याच्या अमानुष छळांपासून मुक्त केलं होतं, तसंच याच दिवशी श्रीराम दशमुखी रावणाचा वध करून अयोध्येत पुन्हा परतले होते. एकार्थने हा दिवस म्हणजे वाईट प्रवृत्ती, असत्य आणि अज्ञानाचा नाश करून ज्ञानाचा नवीन दीपक पेटवण्याचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com