Diwali 2024 Dainik Gomantak
गोवा

Diwali 2024: ..आली दिवाळी! फोव, मिठाई, आकाशकंदील, पणत्यांनी सजल्या बाजारपेठा

Diwali Festival Goa: बालगोपाळांसह सर्वांचा आनंद द्विगुणित करणारी दिवाळी तोंडावर आल्याने सध्या डिचोलीत सर्वत्र या सणाची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठही फुलू लागली असून गावठी पोह्यांसह गोड-तिखट पोहे, चकली, शंकरपाळी, लाडू, चिवडा आदी दिवाळीचा फराळही बाजारात दाखल होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Festive spirit fills the air as Diwali shopping gains momentum In Goa

डिचोली: बालगोपाळांसह सर्वांचा आनंद द्विगुणित करणारी दिवाळी तोंडावर आल्याने सध्या डिचोलीत सर्वत्र या सणाची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीच्या साहित्याने बाजारपेठही फुलू लागली असून गावठी पोह्यांसह गोड-तिखट पोहे, चकली, शंकरपाळी, लाडू, चिवडा आदी दिवाळीचा फराळही बाजारात दाखल होत आहे.

महिला स्वयंसाहाय्य गटांनी तयार केलेला फराळही बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. मिठाईची दुकानेही विविध प्रकारच्या मिठाईने सजू लागली आहेत. पुढील दोन दिवसात सर्व प्रकारची मिठाई बाजारात दाखल होणार आहे. दिवाळीच्या साहित्य खरेदीला अजून म्हणावा, तसा जोर आलेला नाही. मात्र पुढील दोन दिवसात दिवाळीचा बाजार फुलणार आहे.

एक काळ असा होता, की बहुतेक भागात गावठी भातापासून पोहे कांडण्यात येत होते. हा प्रकार कालबाह्य झाला असला, तरी अजूनही दिवाळीला गावठी पोह्यांना मागणी आहे. बाजारी पोह्यांसह गावठी पोहे डिचोलीच्या बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहेत. १०० रुपये किलो असे गावठी पोहे, तर फुलविलेले पोहे १२० रुपये किलो. असे पोह्यांचे दर आहेत. बाजारातील बहुतेक सर्व भुसारी (किराणा) दुकानात गावठी पोहे उपलब्ध आहेत.

खानापूरच्या पणत्या बाजारात

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. घरोघरी आकाशकंदील आणि पणत्या पेटवून दिवाळीचे स्वागत करण्यात येते. मातीकाम करणाऱ्या बहुतेक कलाकारांनी पणती व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या काही वर्षांपासून डिचोलीच्या बाजारपेठेत राज्याबाहेरील पणत्यांची चलती झाली आहे. सध्या डिचोलीच्या बाजारात दोडामार्ग जवळील ''आयी''सह कर्नाटकातील खानापूर येथील पणत्या विक्रीस येवू लागल्या आहेत. शहरातील काही पारंपरिक कलाकार आकाशकंदील सजवून ते बाजारात विक्रीस उपलब्ध करतात. आकाशकंदील सजविण्याच्या कामात सध्या कलाकार व्यस्त असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT