Government Jobs: सरकारी नोकऱ्यांचे 'मायाजाल'! गोव्यातील फसवणूकीचे प्रकार कधी थांबणार?

Goa Job Fraud Case: राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरी म्हणजेच ‘स्थैर्य’ असे वाटते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अविरत धडपड सुरू असते. त्यासाठी कितीही पैसे द्यावे लागले तरी कोणी मागेपुढे पाहत नाहीत आणि याचाच फायदा समाजातील काही ‘चोर’ उठवतात.
Goa Job Fraud Case: राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरी म्हणजेच ‘स्थैर्य’ असे वाटते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अविरत धडपड सुरू असते. त्यासाठी कितीही पैसे द्यावे लागले तरी कोणी मागेपुढे पाहत नाहीत आणि याचाच फायदा समाजातील काही ‘चोर’ उठवतात.
Goa Job Scam CaseCanva
Published on
Updated on

Many Seek Government Jobs for Stability, Leading to Fraud and Corruption At Goa

राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरी म्हणजेच ‘स्थैर्य’ असे वाटते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अविरत धडपड सुरू असते. त्यासाठी कितीही पैसे द्यावे लागले तरी कोणी मागेपुढे पाहत नाहीत आणि याचाच फायदा समाजातील काही ‘चोर’ उठवतात. अनेकांसमोर नोकऱ्यांचा ‘बाजार’ मांडून, ‘आमिष’ दाखवून त्यांना लुबाडतात आणि आपण ऐषोरामात जीवन जगतात. अशाच अनेक प्रकारांना वाचा फुटली आहे. सहाजण गजाआड गेले आहेत. त्यात आणखीही भर पडू शकते. अशा प्रकरणांबाबतच्या सत्यपरिस्थितीचा हा लेखाजोखा...

जुने गोवे येथील श्रावणी ऊर्फ पूजा पुरुषोत्तम नाईक या महिलेने सरकारी नोकरी देण्याच्या मिषाने अनेकांना चुना लावला आहे. सरकारी नोकरी देते असे सांगून या महिलेने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. लोकांच्या घामाकष्टाचे पैसे हडप करताना स्वतः मात्र आलिशान आयुष्य जगत असलेल्या पूजाच्या नशिबी आता पोलिस कोठडी आली आहे.

राज्यात सध्या गाजत असलेल्या जुने गोवे येथील श्रावणी ऊर्फ पूजा पुरुषोत्तम नाईक या महिलेच्या प्रकरणाने युवावर्गाचे डोळे उघडले तरी बस्स झाले. आयुष्य मस्त मजेत जाणार, अशी अटकळ युवा वर्गाकडून बांधली जाते आणि ही सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मग युक्त्या, क्लृप्त्या योजून धडपड केली जाते. अशा धडपडींचा मग फायदा पूजासारखे घेतात आणि आईवडिलांची आयुष्यभराची पुंजी एका झटक्यात नाहिशी होती.

प्रियोळ येथील गुरुदास गावडे यांना चौदा लाख रुपयांना ठकवलेल्या पूजाला अटक झाली आणि या प्रकरणाचा भांडाफोड झाला. खरे म्हणजे पूजाला यापूर्वी तीनवेळा अटक झाली होती. मात्र, तिन्ही वेळा ती सहीसलामत सुटली; पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, असे म्हणतात ते काही खोटे नाही. त्यामुळे पैशांची चटक लागलेल्या पूजाकडून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकार सुरूच राहिले, जे गुरुदास गावडे यांच्यामुळे खंडित झाले आहेत.

मस्तमौला जीवन जगायची पूजा...

पूजा नाईकला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केल्यानंतर तिच्याकडील पाच कारगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यात बीएमडब्ल्यू, फॉर्च्युनर, वेर्ना, अमेझ व एमजी हेक्टर अशा महागड्या कारगाड्यांचा समावेश आहे. या कारगाड्यांची किंमतच लाखो रुपयांत आहे.

जुने गोवे येथील पूजाचा फ्लॅटही आलिशान आहे. पती तसेच दोन मुली असा पूजाचा परिवार असून मुलींना महागड्या गिफ्ट्स मिळायच्या तर पूजाची पर्सच हजारो रुपयांची आहे. आतापर्यंत पोलिसांनी पाच कारगाड्या ताब्यात घेतल्या आहेत.

त्यातील तीन कारगाड्या या पैसे घेतलेल्यांना देण्यात आल्या होत्या. अजूनही जुने गोवे येथे एक कारगाडी आहे. मात्र, ही कारगाडी ज्याच्या ताब्यात आहे, तो गोव्याबाहेर असून चावी त्याच्याकडे असल्याने पोलिसांनी ही कारगाडी ताब्यात घेतलेली नाही.

नेमका कसा व्हायचा गंडवण्याचा प्रकार...

१. श्रावणी ऊर्फ पूजा ही फारशी शिक्षित नाही. मात्र, बोलण्यात चतुर आणि पटाईत असलेल्या पूजाकडे माणसे लगेच आकर्षित होतात, असे पोलिसांच्या प्रथमदर्शनी लक्षात आले.

२. पूजा आमदार, मंत्र्यांना भेटायची. त्यावेळेला तिचे साथीदार संबंधित मंत्री आमदारांसमवेत फोटो काढायचे. हे फोटोच लोकांना गंडवण्यासाठी कामी यायचे.

३. पूजाचा एक साथीदार अजित सतरकर असून तो आपेव्हाळ-प्रियोळ येथील रहिवासी आहे. सध्या तो म्हार्दोळ पोलिसांच्या ताब्यात आहे.

४. अजित व पूजाची मैत्री असल्याने लोकांना गंडवण्याच्या या प्रकारात तोच ‘मिडिएटर’ म्हणून काम करीत होता. अजित सतरकर हा श्रावणी ऊर्फ पूजाची तोंडी जाहिरात करायचा.

५. पूजा ही पर्वरी येथे सचिवालयात मोठ्या हुद्द्यावर कामाला असल्याचे अजित लोकांना सांगायचा. ती कसलेही काम सहज करू शकते, असे पटवून द्यायचा.

६. सावज आपल्या दृष्टिपथात आल्यावर लगेच तो पूजाचे आमदार व मंत्र्यांसोबतचे फोटो त्यांना दाखवायचा आणि सरकारी नोकरीचे आमिष दाखवायचा. त्यानंतर मग पैशांची बोली व्हायची आणि ही बोली यशस्वी झाल्यानंतर मग लगेच पैशांची देवघेव व्हायची.

7. मात्र, पैसे देऊनही सरकारी नोकरी मिळाली नाही तर मग काहीजणांना पैसे परत केले जायचे, त्यामुळे अनेकांचा पूजा व अजितवर विश्‍वाय बसायचा.

८. लाखो रुपयांची उलाढाल व्हायची. हे पैसे मग इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यावर भर दिला जायचा. त्यातच काही महागड्या कारगाड्याही पूजाने खरेदी केल्या होत्या.

९. काहीजणांकडून नोकरी मिळाली नाही की मग पैशांसाठी तगादा लावला जायचा. अशा मोठ्या रक्कमधारकांना पूजा आपल्याकडील कारगाड्या द्यायची. त्यामुळे हे लोक गप्प बसायचे.

१०. पण एवढी मोठी उलाढाल होत असल्याने मुख्य सूत्रधार हा आणखी कोण असायलाच हवा, असा पोलिसांचा कयास आहे, त्यादृष्टीने तपास चालला आहे.

आणखी तक्रारी असल्यास नोंदवा...

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिच्याकडे सरकारी नोकरीच्या बदली आर्थिक व्यवहार केला असल्यास त्वरित म्हार्दोळ किंवा फोंडा पोलिस स्थानकात तक्रारी नोंदवा, असे आवाहन केले आहे. आतापर्यंत पूजा हिच्यावर म्हार्दोळ तसेच डिचोली व पर्वरी पोलिस स्थानकात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

सर्व व्यवहार केले रोख रुपयांनी...

श्रावणी ऊर्फ पूजा नाईक हिने लोकांना सरकारी नोकरी देण्यासाठी लाखो रुपये घेतले; पण हे सर्व पैसे तिने रोख स्वरूपात घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. बँक किंवा इतर कोणत्याही प्रकारे पैसे ट्रान्स्फर केलेले नाहीत. त्यामुळे पैसे किती आणि कसे घेतले त्याबाबत तिने पुरावा मागे ठेवलेला नाही.

अशी विचारधारा!

सरकारी नोकऱ्या मिळवण्यासाठी सध्या युवावर्ग जीवाचा आटापिटा करीत आहे. आताच्या काळात सरकारी नोकरी म्हणजे जीवाचे कल्याण असे समजले जाते, जे खरेच आहे. एक काळ होता, ज्यावेळेला शेती उत्तम, उद्योग दुय्यम आणि नोकरी कनिष्ठ असे मानले जायचे. पण काळ बदलला तसा आता नोकरी तीही सरकारी मिळाली तर मज्जा, अशी विचारधारा बनली आहे.

सरकारी नोकरीच्या आमिषाला सरपंच कुटुंबीयही भुलले

सरकारी नोकरीच्या आमिषांना सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधीही बळी पडतात, हे राज्यातील वेगवेगळ्या प्रकरणांतून स्पष्ट झाले आहे. राज्यात सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून लोकांना लुबाडणारे टोळके कार्यरत झाले आहे. त्यांना कोणाचा वरदहस्त आहे, हे कळण्यास मार्ग नसला तरी सरकारी नोकऱ्या विकावू असल्याचा समज नव्हे, खात्री जनमानसात रुजू होत आहे. सरकारी नोकरी म्हणजे सोनेरी अंडी देणारी कोंबडी आहे, त्यामुळे बेरोजगार युवक व त्यांचे पालक या एंजटांच्या भूलथापांना बळी पडत आहेत.

इडदर-लोलये येथील निशा सूरज च्यारी या योगायोगाने लोलयेच्या सरपंच आहेत. त्याही या आमिषाला बळी पडल्या. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून आपल्या दीराला १५ लाखांचा गंडा घातल्याची तक्रार निशा च्यारी यांनी पोलिसांत दाखल केली आहे. या तक्रारीत महालवाडा-पैंगीण येथील मिथील च्यारी, इडदर येथील प्रितेश च्यारी व मडगाव येथील पराग रायकर यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंत्याची सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून १५ लाख रुपयांची मागणी केली.

त्याप्रमाणे प्रीतेश‌ च्यारी व मिथील च्यारी यांच्या बँक खात्यात प्रत्येकी ६ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यात आले, त्यानंतर उर्वरित तीन लाख रुपये मडगाव येथील पराग रायकर यांना देण्यात आले. यासंदर्भात ३ जुलै २०२३ मध्ये निशा च्यारी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पैसे घेऊनही हे तिघे संशयित सरकारी नोकरी देऊ शकले नसल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना पैसे दिल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, असे निशा च्यारी यांनी सांगितले. पुन्हा एकदा च्यारी यांनी तीन दिवसांपूर्वी या तिघांविरुद्ध कारवाई करण्याची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी पोलिस उपनिरीक्षक बाबू देसाई करत असल्याचे पोलिस निरीक्षक हरिष राऊत देसाई यांनी सांगितले.

Goa Job Fraud Case: राज्यातील प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरी म्हणजेच ‘स्थैर्य’ असे वाटते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अविरत धडपड सुरू असते. त्यासाठी कितीही पैसे द्यावे लागले तरी कोणी मागेपुढे पाहत नाहीत आणि याचाच फायदा समाजातील काही ‘चोर’ उठवतात.
Reis Magos: 'रेईश मागूश' बाबतीत थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार; बांधकामांसाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

कष्टाची कमाई वाया!

यापूर्वी कारवार येथील एका इसमाने नाविक दलात नोकरी देतो असे सांगून काणकोणमधील सुमारे वीस युवकांकडून रक्कम उकळली होती. त्यापैकी काही युवकांना अर्धी रक्कम परत देण्यात आली; परंतु काही युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे. नोकरी नाही आणि आईवडिलांनी कष्टाने जमविलेली कमाई गेली, अशीच त्यांची भावना आहे.

लोलयेतही फसवणुकीचा प्रकार

शिकला सवरलेला उच्चशिक्षित आपला मुलगा बेरोजगार आहे. गावचेच काही युवक सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देतात. यामुळे चालून आलेल्या संधीचा फायदा घेण्याचा निशा च्यारी कुटुंबीयांनी गेल्या वर्षी निर्णय घेतला.

मात्र, सरकारी नोकरी नाहीच, ज्यांना पंधरा लाख दिले ते परत देण्यास टोलवाटोलवी करतात. त्यामुळे ३ जुलै २०२३ रोजी काणकोण पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतरही पैसे परत न मिळाल्याने त्यांनी प्रकरण लावून धरले. कोणत्याही प्रकरणाचा पाठपुरावा केल्याशिवाय न्याय मिळत नाही. आता कुठे या प्रकरणाला तोंड फुटले आहे. यात गुंतलेल्यांचे काय होणार ते गुलदस्त्यात आहे. ज्यांनी पैसे घेतले त्यांना अनेकवेळा सांगूनही ते पैसे देत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com