ST Leaders In Goa Dainik Gomantak
गोवा

ST Leaders In Goa: एसटी समाजातील फूट कोणत्या पक्षाच्या पथ्यावर? नेते विभागलेले

ST Leaders In Goa: पसंतीच्या राजकीय पक्षांना देतात पाठिंबा : आरक्षण कागदावरच

गोमन्तक डिजिटल टीम

ST Leaders In Goa

सध्या एसटी समाजाचे जे नेते राजकीय आरक्षणासाठी आंदोलने, निदर्शने करीत आहेत, त्यांच्यामध्येच विभाजन झाल्याचे दिसून येत असून प्रत्येकजण आपल्या पसंतीच्या राजकीय पक्षांना पाठिंबा जाहीर करू लागला आहे.

या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोवा मतदारसंघात तरी एसटी मतदारांवर भाजप, काँग्रेस व रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्ष अवलंबून आहेत. एसटी समाजातील नेत्यांची विभागणी नेमकी कुठल्या पक्षाच्या पथ्यावर पडणार आहे, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वेळीप हे सध्या भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांचा प्रचार करीत आहेत. तर मिशन राजकीय आरक्षणाचे निमंत्रक ॲड. जॉन फर्नांडिस हे कॉंग्रेससोबत आहेत. रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टीचे उमेदवार रुबर्ट परेरा यांनाही काही प्रमाणात एसटी समाजाची मते मिळणार आहेत. पण परेरा हे भाजप व कॉंग्रेसला दोष देत आहेत.

भाजपकडे तसे पाहिले गेल्याच एसटी नेत्यांची कमतरता नाही. यात स्वत: सभापती रमेश तवडकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, सावर्डेचे आमदार गणेश गावकर, माजी आमदार वासुदेव मेंग गावकर आणि प्रकाश वेळीप यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

दक्षिण गोव्यात एसटी समाजाची सुमारे ५० हजार मते आहेत. मात्र, ही एकत्रित मते नाहीत. ही मते केपे, काणकोण, सांगे, फोंडा, सासष्टी व मुरगाव तालुक्यांमध्ये विभागली गेली आहेत. सासष्टी व मुरगावमध्ये ख्रिस्ती एसटी समाजाचा प्रभाव आहे. त्यामुळे एसटी समाजाची मते केवळ एकाच पक्षाला मिळण्याची शक्यता कमीच दिसते.

‘उटा’ पक्षांशी बांधील नाही!

प्रकाश वेळीप म्हणाले, उटा संघटना ही कुठल्याही पक्षाशी बांधील नाही. या संघटनेमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचा अवलंब करणारे नेते व कार्यकर्ते आहेत. त्यामुळे उटा संघटनेतील नेत्यांवर व सदस्यांवर कोणत्या राजकीय पक्षाला द्यावा, याबद्दल कुठलेही बंधन घातलेले नाही.

एसटी समाजाला राजकीय आरक्षण देण्यास नाहक विलंब केला आहे, असे ‘मिशन राजकीय आरक्षण’चे निमंत्रक जॉन फर्नांडिस सांगतात. केंद्र सरकारने जे आश्र्वासन दिले आहे ते केवळ कागदावरच आहे. अद्याप प्रत्यक्षात त्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे एसटी समाजातील लोक भाजपविरोधी मतदान करतील, असेही फर्नांडिस सांगतात.

यावेळी मी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांचा प्रचार करीत आहे. समाजातील बहुसंख्य लोक भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देतील. केंद्राने राजकीय आरक्षण देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.

- प्रकाश वेळीप, अध्यक्ष, उटा संघटना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

BMW i5 LWB ची भारतात ग्रँड एन्ट्री! एका चार्जमध्ये 669 किमी धावणार, 268 bhp पॉवर अन् लक्झरी फीचर्स मिळणार; किंमत किती? पाहा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT