Pernem Local Protest Dainik Gomantak
गोवा

Pernem Local Protest: पेडणे स्थानकावर बस थांबवण्यासाठी नागरिकांचे उपोषण; उपजिल्हाधिकारी म्हणाले...

उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर पेडणेकरांनी आपले उपोषण घेतले मागे

Kavya Powar

Pernem Local Protest : राजधानी पणजीतून निघणाऱ्या आंतरराज्य एसटी बसेस पेडणे बसस्थानकावर न थांबता महाराष्ट्रात जातात. त्यामुळे या गाड्या पेडणे बसस्थानकावर वळवाव्यात, असे निवेदन पेडणेकरांनी उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांना दिले होते. जर यावर कोणतीच कारवाई नाही झाली तर उपोषणाला बसण्याचा इशारा पेडणेवासियांनी दिला होता.

दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर आज (7 सप्टेंबर) पेडणेतील नागरिक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला.

यानंतर उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी नागरिकांची भेट घेतली. आपण महाराष्ट्र आणि गोव्यातील डेपोमध्ये बोललो असून, गाड्या बस स्थानकावर वळवण्यात येतील, तसेच यासाठी मार्गावर वाहतूक पोलीसही तैनात केले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे इथून पुढे पेडणे स्थानकावर गाड्या थांबतील, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर पेडणेकरांनी आपले उपोषण मागे घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT