Bonderam Festival  Dainik Gomantak
गोवा

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Divar Island: गोव्यातील दिवाडी बेट रंग, संगीत आणि सामुदायिक उत्साहाने नटते. १६ ऑगस्ट रोजी सां माथियस-मळार येथे साजऱ्या झालेल्या बोंदेरा उत्सवाने पुन्हा एकदा गोमंतकीय संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवले.

Sameer Panditrao

पणजी: प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात गोव्यातील दिवाडी बेट रंग, संगीत आणि सामुदायिक उत्साहाने नटते. यंदा, काल १६ ऑगस्ट रोजी सां माथियस-मळार येथे साजऱ्या झालेल्या बोंदेरा उत्सवाने पुन्हा एकदा गोमंतकीय संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवले. सां माथियस क्रीडा क्लब आणि गोवा पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उत्सवात स्थानिक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

बोंदेरा हा उत्सव दिवाडी बेटावरील सां माथियस आणि पिएदाद या दोन प्रभागांमध्ये दोन वेगवेगळ्या शनिवारी साजरा केला जातो. यंदा मळार येथे काल १६ ऑगस्टला हा उत्‍सव साजरा झाला, तर पिएदाद येथे २३ ऑगस्टला हा उत्सव रंगणार आहे.

सदर उत्सव ‘बंदेरा’ या पोर्तुगीज शब्दापासून प्रेरित आहे, ज्याचा अर्थ ‘ध्वज’ असा आहे. पोर्तुगीज काळात गावकऱ्यांमधील जमिनीच्या सीमांवरील वादांमुळे या उत्सवाची सुरुवात झाली. आज हा उत्सव सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक बनला आहे.

या उत्सवात आधुनिकतेचा स्पर्शही दिसून आला. ‘बोंदेराचेम जीईडी टॉक्स’ आणि ‘बोंदेरांचो उजवाड’ या कार्यक्रमांमध्ये पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनी हरित भविष्यासाठी प्रेरणादायी व्याख्याने दिली. याशिवाय, पारंपारिक खेळ जसे की ‘खटोडियो’ आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धांनी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन केले.

उत्सवाची सुरुवात आणि वैशिष्ट्ये

यंदाच्या बोंदेरा उत्सवाची सुरुवात ‘पातोईंचे फेस्त’ने झाली, जिथे उपस्थितांना पातोळ्या तयार करण्याचे प्रात्यक्षिक आणि कार्यशाळा अनुभवायला मिळाली. शिवाय, ‘बोंदेराचेम जेवण’ या कार्यक्रमात गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली.

पारंपारिक पदार्थ जसे की पातोळ्या, सान्ना, पुडे आणि गोडशे यांनी सर्वांचे मन जिंकले. दुपारच्या सत्रात ‘बोंदेराची पासय’ ही पदयात्रा आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये गावकऱ्यांनी आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT