Paresh Naik  Dainik Gomantak
गोवा

Rumdamol Panchayat: रुमडामळ-दवर्ली पंचायत क्षेत्रात बेकायदेशीर धंद्याना ऊत; परेश नाईकांकडून कारवाईची मागणी

Paresh Naik: दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीने यात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी संबंधित खात्यांना करावी.

गोमन्तक डिजिटल टीम

रुमडामळ-दवर्ली पंचायत क्षेत्रात बेकायदेशीर धंद्याना ऊत आलेला आहे. हे क्षेत्र निवासी क्षेत्र असूनही तिथे स्क्रॅप यार्ड, चिकन व मांस विक्री, मोबाईल गाडे, खाद्यपदार्थ गाडे, गुटखा विक्रीसारखे बेकायदेशीर धंदे सुरू आहेत.

मात्र, पंचायत त्यावर काहीही कारवाई करीत नाही. तेथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. तेव्हा दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीने यात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी संबंधित खात्यांना करावी, असे जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक यांनी बुधवारी (ता.१०) मासिक बैठकीत सांगितले.

मायणा-कुडतरी पोलिसांनी या दोन्ही पंचायत क्षेत्रातील भाडेकरूंची माहिती मिळवावी. त्यासाठी जिल्हा पंचायतीने प्रयत्न करावेत. त्यासाठी यासंंदर्भातील निवेदन जिल्हा पंचायतीने संबंधित खात्यांना पाठविण्याची मागणी जिल्हा पंचायत सदस्य परेश नाईक यांनी यावेळी केली.

पंचायतीसंदर्भातील या सर्व समस्या किंवा प्रश्र्न जिल्हा पंचायतीच्या अधिकारांत येतात की नाही, हे पाहावे लागेल व त्यानुसार पुढील पाऊल उचलावे लागेल, असे दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी फ्लोरिना कुलासो यांनी नाईक यांना सांगितले.

कोमुनिदादची जागा किती?

रुमडामळ-दवर्ली व दवर्ली-दिकरपाल या दोन्ही पंचायत क्षेत्रात कोमुनिदादची जागा आहे. या जागेवरही बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. दोन्ही पंचायत क्षेत्रातील कोमुनिदादची एकूण जमीन किती आहे, त्यातील सरकारने किती ताब्यात घेतली आहे व किती जागेवर बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत, ही माहिती दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीने संबंधित खात्यांकडून मिळवावी, अशी मागणीही परेश नाईक यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT