Rumdamol Panchayat : रुमडामळात पोलिसांची करडी नजर; नमाजावेळी पोलिस बंदोबस्त

रुमडामळ शांतता पाळावी : पोलिसांचे आवाहन
heavy police force deployed in Rumdamol
heavy police force deployed in RumdamolDainik Gomantak
Published on
Updated on

रुमडामळ-हाऊसिंग बोर्ड येथे सध्‍या हिंदू-मुस्‍लीम वादावरून वातावरण अशांत झालेले असताना शुक्रवारी येथील मशिदीमध्‍ये नमाज पढताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या मशीद परिसरात कडक पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. रुमडामळ शांतता पाळावी, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

पुन्हा तिथे उद्रेक होऊ नये, म्हणून पोलिसांनी या भागावर करडी नजर ठेवली आहे.

heavy police force deployed in Rumdamol
Goa Accident: सुकतली मोले येथे महामार्गावर भरधाव टेम्पोची ट्रकला धडक; चालक जखमी

दक्षिण गोव्‍यातील मडगाव, मायणा-कुडतरी, कोलवा, फातोर्डा व कुंकळ्‍ळी या पोलीस स्‍थानकातील पोलिसांबरोबर आयआरबीच्‍या जवानांची तैनात करण्‍यात आली होती. मात्र हा नमाज पढताना कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, अशी माहिती या भागात तैनात करण्‍यात आलेले पोलिस उपनिरीक्षक प्रशांत भगत यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी या भागातील तणाव कमी व्‍हावा, यासाठी पोलिसांनी या भागात संचलनही केले होते. रुमडामळ पंचायतीचे पंच विनायक वळवईकर यांच्‍यावर खुनी हल्‍ला झाल्‍यानंतर या भागातील वातावरण चिघळले होते. नंतर त्‍याला धार्मिक वळण लागले होते.

heavy police force deployed in Rumdamol
Ponda News: फोंड्यात घरांमध्ये, दुकानात घुसले तुंबलेल्या नाल्याचे पाणी; स्थानिकांचे नुकसान

मदरसा तूर्तास बंद

ज्‍या मदरसामुळे रुमडामळमध्‍ये वाद निर्माण झाला होता, तो मदरसा तूर्तास बंद ठेवावा आणि त्‍यात कुठल्‍याही प्रकारचे काम केले जाऊ नये, अशी सूचना पंचायत सचिवांनी केली आहे. काल या भागातील बीफ स्‍टॉलचीही पाहणी करण्‍यात आली.

या विक्रेत्‍यांनी बीफ उघड्यावर ठेवून विकू नये, अशी सूचना करण्‍यात आली असून हे बिफ उघड्यावर न ठेवता फ्रीजमध्‍ये ठेवून विकावे, असे सांगण्‍यात आले आहे. ही पाहणी करताना सरपंच मुबिना फणिबंद आणि पंच समीउल्‍ला फणिबंद हे उपस्‍थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com