Azadi Ka Amrit Mahotsav Dainik Gomantak
गोवा

Independance Day 2022: देशाचे अखंडत्व कायम राखूया!

रवी नाईक: फोंड्यात विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण

दैनिक गोमन्तक

फोंडा: भारत देशाला जागतिक पातळीवर इतर देशांकडून मिळणारा मान हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक नेतृत्वामुळे असून भारत देश विश्‍वगुरू व्हावा अशी मनिषा पंतप्रधानांनी व्यक्त केली असल्याने आपण सर्वांनी त्यांच्या संकल्पनेला सहकार्य करून देशाचे अखंडत्व कायम राखून अधिक उंचीवर नेण्यासाठी योगदान द्यायला हवे, असे उद्‌गार कृषीमंत्री रवी नाईक यांनी काढले.

(Distribution of national flag to students at ponda)

खडपाबांध - फोंडा येथील सभागृहात आज विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक आनंद नाईक व अन्य नगरसेवकांसह भाजपचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी व शिक्षकवर्ग उपस्थित होता.

रवी नाईक म्हणाले की, आपला देश हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन चालणारा देश आहे. आपल्या देशात सर्वधर्मसमभावाला महत्त्व आहे, त्यामुळेच सर्वजण मिळून मिसळून राहत असल्याने देशाच्या प्रगतीला ते पूरकच आहे. आपल्या देशाच्या विकासासाठी आणि देशबांधवांच्या हितासाठी सरकारकडून अनेक योजना आणि उपक्रम राबवले जात असून अशा योजना आणि उपक्रमांचा लाभ देशातील नागरिकांनी घ्यावा. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनीही सर्वांना शुभेच्छा देताना देशाचे अखंडत्व अबाधित ठेवताना तिरंगा झेंड्याचा मान राखूया आणि देशाच्या विकासासाठी योगदान देऊया, असे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT