Shree Navadurga Saustha Madkai Goa Sadanand Kamat
गोवा

Navdurga Temple Dispute: नवदुर्गा मंदिराचा वाद जाणार सर्वोच्च न्यायालयात; 'जुनी मूर्ती बदलू नये' हा ठराव मंजूर

Navdurga Temple Madkai: मडकईतील नवदुर्गा मंदिराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असून त्यासंबंधीचा ठराव श्री नवदुर्गा प्रतिष्ठानच्या जाहीर सभेत घेण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

Navdurga Temple Madkai Goa Dispute

फोंडा: मडकईतील नवदुर्गा मंदिराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असून त्यासंबंधीचा ठराव श्री नवदुर्गा प्रतिष्ठानच्या जाहीर सभेत घेण्यात आला. मडकई येथील पंचायत सभागृहात ही जाहीर सभा आज (गुरुवारी) घेणयात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाय जुनी मूर्ती बदलू नये, मंदिर ही खासगी मालमत्ता नसून ते सार्वजनिक करावे, देवकृत्य तसेच उत्सव आणि धार्मिक विधींवर सर्व लोकांचा समान हक्क असावा, असे आणखी तीन ठराव यावेळी एकमताने घेण्यात आले.

मडकई येथे ही जाहीर सभा नवदुर्गा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेंद्र पणजीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आश्‍विनकुमार नाईक, केशव गावडे, प्रसाद नाईक, विशाखा गडांबी, प्रेमानंद गावडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

आश्‍विनकुमार नाईक म्हणाले की, पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून लावले तरी एका विशिष्ट समाजाने त्यांच्या सोयीचे कायदे बनवले. महाजनांनी व्यवस्थापन सांभाळायचे असते मात्र धार्मिक व्यवहार हे सर्वांसाठी खुले असायला हवे. मडकईवासीय एकजूट आहेत, त्यांच्यात कुणीही फूट पाडू शकत नाही; कारण देवीचा वरदहस्त आमच्या डोक्यावर आहे. महाजनांनी मूर्ती बदलणार नसल्याची जाहिरातबाजी करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे मंदिराची क्रांती ही मडकईवासीय करतील, असा विश्‍वास आश्‍विनकुमार नाईक यांनी व्यक्त केला.

केशव गावडे म्हणाले की, मडकईवासीयांनी एकजूट राखण्याची खरी गरज आहे. यापूर्वीही ग्रामस्थांत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले आणि आताही होतील; पण सर्वांनी एकजुटीने हा लढा लढायचा असल्याचे केशव गावडे म्हणाले.

प्रेमानंद गावडे म्हणाले, अंधश्रद्धेमुळे बहुजन समाज पिचत पडला आहे. देवीवर विश्‍वास ठेवूया, देवी नवदुर्गा ही सर्वांची माता आहे, तिचा वरदहस्त सर्वांवर आहे, त्यामुळे नवदुर्गा प्रतिष्ठानने पुकारलेल्या लढ्याला सर्वांनी मिळून साथ करूया, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सतीश नाईक, कालिदास बांदोडकर, प्रीतम नाईक, दुर्गादास नाईक, शिवप्रसाद नाईक, दिलीप नाईक आणि इतरांनी विचार व्यक्त करताना सर्वांनी एकजुटीने लढा लढण्याचा निर्धार व्यक्त केला. सूत्रसंचालन सुशांत नाईक यांनी केले.

पंतप्रधानांकडेही दाद मागू

शैलेंद्र पणजीकर म्हणाले की, पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून लावले तरी अजूनही मंदिरांसाठी मात्र त्यांच्याच कायद्याचा वापर केला जात आहे. ही एकप्रकारची बंधनशाही असून गोवा मुक्त झाला तरी पोर्तुगिजांचे जोखड आजही बहुजन समाजाच्या माथ्यावर आहे. नवदुर्गा मंदिरप्रश्‍नी उच्च न्यायालयाने आम्हाला जरी नाउमेद केले असले तरी न्यायासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावू. प्रसंगी पंतप्रधानांकडेही आम्ही दाद मागू.

भव्य रॅली, जोरदार घोषणाबाजी

ग्रामस्थांनी पंचायत सभागृह ते मंदिरापर्यंत भव्य रॅली काढत जोरदार घोषणा दिल्या. मंदिरात पोचल्यावर देवीचे नामस्मरण करून देवीचा आशीर्वाद घेण्यात आला. सभेवेळी सभागृह पूर्ण भरून गेले होते. जागा नसल्याने लोकांनी सभागृहाबाहेर राहणे पसंत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा वीज विभागाचा अलर्ट! उत्तर आणि दक्षिण गोव्यातील 'या' भागांत वीज पुरवठा खंडित; दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय

IND vs NZ: 'किंग' कोहलीची ऐतिहासिक 'विराट' ओव्हरटेकिंग; मैदानात पाऊल ठेवताच मोडला सौरभ गांगुलीचा मोठा रेकॉर्ड

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

SCROLL FOR NEXT