Khorlim Panchayat Dainik Gomantak
गोवा

Khorlim Panchayat: कचऱ्याच्या समस्येवरून खोर्ली ग्रामसभेत आरोप – प्रत्यारोप

Khorlim Gram Sabha Garbage Dispute: सत्ताधारी मंडळ आणि माजी सरपंच यांच्यात कचरा गोळा करण्यावरून भ्रष्टाचार झाल्याचे आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: कचरा गोळा करण्याच्या विषयावरून खोर्ली पंचायतीची ग्रामसभा वादळी ठरली. विद्यमान सत्ताधारी मंडळ आणि माजी सरपंच यांच्यात या विषयावरून आरोप – प्रत्यारोप करण्यात आले. दोघांनी कचरा गोळा करण्यावरून भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले.

सरपंच फ्रीडा पो यांनी माजी सरपंच बाप्टिस्ट परेरा यांच्या कार्यकाळात कचरा गोळा करण्यावरून घोटाळा झाल्याचा आरोप केला. कामगारांना धनादेश काढण्यात आले होते, परंतु एक कामगार वगळता इतरांना पैसे मिळाले नाहीत.

यावरून बाप्टिस्ट परेरा यांनी पो यांच्यावर हल्लाबोल करत विद्यमान सत्ताधारी मंडळ दर दिवशी कचरा गोळा करण्याच्या नावाने घोटाळा करून पैशांचा गैरव्यवहार करत असल्याचा आरोप केला. कामगारांना पैसे देण्याच्या नावाआड भलतेच पैसे घेत असून कचरा गोळा केला जात नाही, असे परेरा म्हणाले.

दरम्यान, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी खोर्ली पंचायतीत भ्रष्टाचार होत असल्याचा मुद्दा विधानसभेत मांडला होता. कचरा गोळा करण्यासाठी पंचायत ४ लाख रुपये दर महिन्याला देत असून पंच सदस्यांचे पती कचरा गोळा केल्याचे पैसे घेत असल्याचा आरोप फळदेसाई यांनी केला होता.

पैसेच मिळाले नसल्याचा कंत्राटदाराचा दावा

कचरा गोळा करणारे माजी कंत्राटदार सुनील मेवाडा यांनी आपल्याला चार महिन्यांच्या कामाचे पैसे दिले नसल्याचा खुलासा केला. आपण विद्यमान सत्ताधारी मंडळाला कमिशन न दिल्याने माझी सेवा बंद केली आणि नंतर पैसे थकीत ठेवले, असा दावा मेवाडा यांनी केला. त्यानंतर पंचायतीने माहिती दिली की कचरा गोळा करण्यासाठी निविदा काढलेली नाही. यावरून लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पंचायत मंडळावर ताशेरे ओढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

SCROLL FOR NEXT