Stray Dogs Dainik Gomantak
गोवा

Stray Dogs: भटक्या कुत्र्यांबाबत मार्गदर्शक तत्त्‍वे फलकावर लावा, शिक्षण संस्‍थांना निर्देश; परिपत्रक जारी

stray dog guidelines board: गोव्‍यासह देशभर भटक्‍या कुत्र्यांनी उच्‍छाद मांडला आहे. त्‍यांच्‍याकडून नागरिकांना चावे घेण्‍याचे प्रकार घडत आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: शैक्षणिक संस्‍थांच्‍या परिसरात भटक्‍या कुत्र्यांना रोखण्‍यासंदर्भात सर्वोच्च न्‍यायालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्‍वे विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्‍थांच्‍या भागधारकांच्‍या लक्षात आणून देण्‍यासाठी ती ‘नोटीस बोर्ड’वर लावावी आणि त्‍याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे परिपत्रक शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी मंगळवारी जारी केले आहे.

गोव्‍यासह देशभर भटक्‍या कुत्र्यांनी उच्‍छाद मांडला आहे. त्‍यांच्‍याकडून नागरिकांना चावे घेण्‍याचे प्रकार घडत आहेत. त्‍यात काही जणांचा मृत्‍यू होत असून, अनेकजण जखमीही होत आहेत. त्‍यामुळे सर्वोच्च न्‍यायालयाने काही दिवसांपूर्वी भटक्‍या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्‍यासाठी देशातील सर्वच राज्‍ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक तत्त्‍वे जारी केली होती.

भटक्‍या कुत्र्यांपासून विद्यार्थी, नागरिकांचे संरक्षण करण्‍यासाठी शैक्षणिक संस्‍था, रुग्‍णालये, क्रीडा संकुले, पर्यटन स्‍थळे, धार्मिक स्‍थळे, विमानतळे आदींच्‍या इमारतीभोवती सहा फूट उंचीचे कुंपण उभारण्‍यात यावे, तेथे संबंधित आस्‍थापनांनी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करून त्‍याच्‍यावर या परिसरात भटकी कुत्री येणार नाहीत, याची खातरी करण्यास सांगितले आहे.

काटेकोर अंमलबजावणी व्हावी!

निवारा शेडमध्‍ये चोवीस तास वॉचमन आणि त्‍यांना खाद्य पुरवण्‍यासाठी कर्मचारी नेमा, कुत्र्यांचे लसीकरण तसेच निर्बिजीकरण करावे, भटकी कुत्री दत्तक घेण्‍याबाबत मार्गदर्शन करून जागृती करावी, कुत्र्यांनी चावा घेतल्‍यास प्रथमोपचारांबाबतची पोस्‍टर्स शिक्षण संस्‍थांनी नोटीस बोर्डवर लावावी, असे सर्वोच्च न्‍यायालयाने मार्गदर्शक तत्त्‍वांत म्‍हटले होते.

या तत्त्‍वांसंदर्भातील माहिती नोटीस बोर्डवर लावून काटेकोर अंमलबजावणीच्‍या सूचना शिक्षण संचालक झिंगडे यांनी सर्वच शैक्षणिक संस्‍थांना केल्‍या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू अखेर पोलिसांच्या ताब्यात! मोपा विमानतळावरून थेट वैद्यकीय तपासणीसाठी

SCROLL FOR NEXT