कॉंग्रेस गट समिती Dainik Gomantak
गोवा

Ponda: बरखास्त केलेली कॉंग्रेस गट समिती पुन्हा स्थापन करणार

राज्यात कॉंग्रेस गट समिती उत्कृष्ट कार्य करीत असून आमच्या मागे मडगावचा नंबर लागत आहे.

दैनिक गोमन्तक

फोंडा: फोंडा (Ponda) येथील बरखास्त केलेली कॉंग्रेस (Congress) गट समिती व केंद्रीय कॉंग्रेसच्या सदस्यांनी बुधवारी सकाळी गोव्याचे (Goa) कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव (Dinesh Gundu Rao) यांची मडगावातील (Margao) एका हॉलमध्ये भेट घेऊन चर्चा केली. अचानक बरखास्त केलेल्या फोंडा कॉंग्रेस गट समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर पुन्हा तीच समिती स्थापन करणार असल्याचे आश्‍वासन दिनेश गुंडू राव यांनी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अरुण गुडेकर यांनी दिली. (Dismissed Congress group committee in Ponda will be reconstituted)

बुधवारी सायंकाळी फोंडा येथील अंत्रुज शिमगोत्सव समितीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष हुसेन मुल्ला, समितीचे माजी अध्यक्ष जॉन परेरा, पदाधिकारी किशोर नाईक, शब्‍बीर शेख, दिलीप नाईक, जोस रॉड्रिग्स, अचला वेरेकर, संगीता नाईक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी जॉन परेरा म्हणाले, फोंडा कॉंग्रेस गट समिती बरखास्त झाल्याची माहिती मिळताच आम्हाला आश्‍चर्य वाटले. राज्यात कॉंग्रेस गट समिती उत्कृष्ट कार्य करीत असून आमच्या मागे मडगावचा नंबर लागत आहे. याबाबत आम्ही फोंड्याचे आमदार रवी नाईक यांना विचारणा केली असता, आपल्याला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. नंतर एम. के. शेख यांच्याकडे विचारणा केली असता मला तसा आदेश आला असल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी कॉंग्रेस गट समितीने दिनेश गुंडू राव यांची भेट घेऊन सविस्तर माहिती कथन केली.

अध्यक्षपदी पुन्हा गुडेकर

आमदार रवी नाईक हे फोंडा कॉंग्रेस गट समितीला विश्‍वासात घेऊन काम करीत असल्याची माहिती परेरा यांनी दिली. फोंडा कॉंग्रेस गट समितीचे अध्यक्ष अरुण गुडेकर म्हणाले, कोणतेही कारण किंवा नोटीस न देता अचानक फोंडा कॉंग्रेस गट समिती बरखास्त करण्यात आली. यावर विचार विनिमय करून पुन्हा तीच समिती स्थापन करण्यात येणार असून मला गट समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यात येणार आहे, असे गुडेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT