Utpal Parrikar: Goa Political Update Dainik Gomantak
गोवा

Utpal Parrikar: स्वत:च्या पक्षाने डावलल्यामुळे उत्पल पर्रीकर 'आप'कडून लढणार?

अरविंद केजरीवाल यांचे उत्पल पर्रीकरांना खुले आवाहन; उत्पल यांच्या निर्णयाकडे गोव्याचे लक्ष

दैनिक गोमन्तक

Utpal Parrikar: आगामी विधानसभा निवडणुकीमुळे गोव्याच्या राजकारणात कमालीच्या हालचाली सुरू आहे. परस्परविरोधी पक्षांमध्ये निवडणूक विजयी होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी वाटेल ते करायची तयारी राजकीय पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसात गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) हे चांगलेच चर्चेत आहेत. वडिलांनी ज्या मतदारसंघातून समाजकारण केले तिथून निवडणूक लढवणारच असा त्यांनी निर्धार केला आहे. पण त्यांच्या निर्धाराला पक्षाचा मात्र पाठिंबा असल्याचे दिसत नाही. पण आता उत्पल पर्रीकर ही 'आप' (AAP) पक्षात जाणार की अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे.

त्यांच्याऐवजी पक्षातर्फे बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) यांना उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे. एवढेच नव्हे तर उत्पल पर्रीकर यांनी दिल्लीला जाऊन पक्षश्रेष्ठींशी यासंबंधी चर्चा केली असता, त्यांना हे समजावण्यात आले की ही जागा बाबूश मोन्सेरात यांनाच देणे सोयीस्कर असेल, कारण ते निवडून येण्याची शक्यता जास्त आहे. तरीदेखील उत्पल यांनी हार मानली नाही. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या परिस्थितीचा फायदा घेत उत्पल यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी अद्याप कोणताच निर्णय दिलेला नाही.

यातच काल अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) दिल्लीतून गोव्यात आले. त्यांनी घरोघरी निवडणुकीसाठी प्रचार केला. दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना सध्या उत्पल पर्रीकरांबद्दल चाललेल्या चर्चांबद्दल विचारले असता, केजरीवाल म्हणाले की, 'मी स्व. मनोहर पर्रीकर यांचा मनापासून अंदर करतो. सध्या त्यांच्या मुलाबद्दल चाललेल्या चर्चा मला माहीत आहेत. त्यांना जर निवडणूक लढवायची असेल आणि त्यांना जर आम आदमी पक्षात यायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे.' अरविंद केजरीवाल यांच्या या व्यक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चासत्रे रंगू लागली आहेत. त्यांनी एका अर्थाने उत्पल पर्रीकर यांना पक्षात खुले आवाहन दिले आहे. स्वत:च्या पक्षाने डावलल्यामुळे ते आता 'आप'च्या या आवाहनाचा स्वीकार करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

Cameron Green: 25 कोटींचा 'किंग' शून्यावर आऊट! IPL लिलावात इतिहास रचणाऱ्या कॅमेरुन ग्रीनची दुसऱ्याच दिवशी फजिती; सोशल मीडियावर चर्चांना उधाण VIDEO

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa Crime: वाळपई हादरली! 41 वर्षीय महिलेचे अपहरण करुन जंगलात लैंगिक अत्याचार; अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

SCROLL FOR NEXT