Rohit Monserrat Dainik Gomantak
गोवा

पणजीत नव्या महापौरांच्या नावाची चर्चा

पणजीचे विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांची महापौर पदाची एक वर्षाची मुदत 30 मार्च रोजी संपत आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजीचे विद्यमान महापौर रोहित मोन्सेरात यांची महापौर पदाची एक वर्षाची मुदत 30 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे नव्या महापौरांच्या नावाची चर्चा सध्या सुरू झाली आहे. मात्र, पणजीत बाबूश मोन्सेरात कुटुंबीयांचे वाढलेले राजकीय वजन पाहता पुन्हा एकदा महापौर पदासाठी रोहित मोन्सेरात यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

माजी महापौर उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो यांनी आपण महापौरपदाच्या शर्यतीत नाही, असे यापूर्वीच जाहीर केल्याने पुन्हा एकदा महापौरपदी विराजमान होण्याचा रोहित मोन्सेरात यांचा मार्ग मोकळा झाला आहे, अशीच स्थिती आहे.

आदर्श आचारसंहिता मागे

देशभरात पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने लागू केलेली आदर्श आचारसंहिता आज मागे घेण्यात आली. 8 जानेवारी रोजी लागू केलेली आचारसंहिता मागे घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव नरेंद्र बुटोलिया यांनी जारी केलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

देशात गोव्यासह मणिपूर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब येथील विधानसभेच्या निवडणुका झाल्या तसेच आसाम राज्यातील पोटनिवडणूकही पार पडली. उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये 14 फेब्रुवारीला मतदान झाले होते आणि 10 मार्चला मतमोजणी पार पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: तरुणीची अजब ड्रायव्हिंग स्टाईल व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटीझन्स लोटपोट; म्हणाले, ''ब्रेकअप करुन आली...''

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT