गोव्यातील दिग्गजांना 'जोर का झटका'

3 मंत्री, 2 आमदार, 2 प्रदेशाध्यक्ष, एका निमंत्रकाचे डिपॉझिट जप्त
 NCP
NCPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मतदारांशी सतत संवाद न साधणाऱ्या नेत्यांच्या नशिबी निवडणुकीतली अनामत गमावण्याची वेळ हमखास येते. याचा अनुभव यावेळी मावळत्या विधानसभेतील तीन मंत्री, दोन आमदार यांच्यासह दोन प्रदेशाध्यक्ष आणि एका पक्ष निमंत्रकाने घेतला आहे.

उमेदवारांना अनामत जप्त होण्याची नामुष्की टाळायची असेल तर एकूण मतदानाच्या किमान एक शष्ठांश मते (16.66 %) प्राप्त करणे आवश्यक असते. पण प्रदेशाध्यक्ष, मंत्री आणि आमदार असूनही जर तेवढीही पत मतदारांमध्ये नसेल तर..?

 NCP
पणजी बाजारात मासळी महागली

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुझे फिलीप डिसोझा हे यंदा दाबोळी मतदारसंघातून रिंगणात उभे होते. त्या मतदारसंघात 18,745 इतके मतदान झाले, तर डिसोझा यांना केवळ 1,037 (5.53 %) मते मिळाली. आम आदमी पक्षाचे राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे हे म्हापसा मतदारसंघातून लढत होते. तिथले मतदान झाले 23,138 तर म्हांबरे यांना मिळाली 1,511 (6.53%) मते. तृणमूल कॉंग्रेसचे किरण कांदोळकर यांच्यावरही अनामत रक्कम गमावण्याची वेळ आली. हळदोणे मतदारसंघातून (एकूण मतदान 22,496) लढताना ते केवळ 3,647 (16.21%) मतांत गारद झाले.

अनामत गमावण्याची वेळ कुठ्ठाळी मतदारसंघातून आम आदमी पक्षाची उमेदवारी मिळालेल्या माजी मंत्री एलिना साल्ढाणा (एकूण 23,924 मतांपैकी 1,355 मते, 5.66%) आणि वेळ्ळीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळालेले फिलीप नेरी रॉड्रिग्स (एकूण 23,390 मतांपैकी 3,240 मते, 14.62%) यांच्यावरही आली. शिवोलीचे मावळते आमदार आणि माजी मंत्री विनोद पालयेकर (एकूण 24,940 मतांपैकी 409 मते, 1.64%) यांना तर मतदारांनी सपशेल नाकारले.

 NCP
गोव्यात कोरोनाचे 13 नवे रूग्‍ण; सक्रिय 99

झांट्ये यांची जिद्द, तरीही पराभव

जिंकून येण्याची शक्यता नाही म्हणून भाजपकडून डावलले गेलेले मयेचे मावळते आमदार प्रवीण झांट्ये यांनी मगो पक्षाचे उमेदवार म्हणून लढत दिली खरी; पण त्या मतदारसंघात मतदान करणाऱ्या 25,488 पैकी केवळ 3,240 मतदारांनी (13.43%) त्यांची सोबत केली. नुवेतून अपक्ष लढलेले विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान (एकूण 21,811 मतांपैकी 2,887 मते, 13.58%) यांचीही गच्छंती झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com