Goa Garbage Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Garbage Issue: कचरावाहू ट्रकांतील घाण पाणी रस्त्यावर

मडगाव पालिका क्षेत्रातील 35 टन ओल्या कचऱ्यापैकी 20 टन काकोडा येथे नेण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Garbage Issue: मडगाव पालिका क्षेत्रातील 35 टन ओल्या कचऱ्यापैकी 20 टन काकोडा येथे नेण्यात येत आहे. 10 टन साळगाव कचरा प्रकल्पात नेताना रस्त्यावर अनेक ठिकाणी घाण पाणी सांडत आहे तसेच काही ठिकाणी कचरा रस्त्यावर पडत आहे.

हा प्रकार वारंवार घडल्यास मडगाव पालिकेचे कचरावाहू ट्रक कचरा व्यवस्थापन महामंडळाला थांबवावे लागतील, यासंदर्भातील पत्र पालिकेला पाठवले असून कचरा रस्त्यावर पडणार नाही, याची योग्य दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

काकोडा येथील स्थानिकांकडून मडगावातील कचरा काकोडा कचरा विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पात आणण्यास विरोध केला असला तरी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस बंदोबस्तात तो महामंडळाच्या विशिष्ट वाहनांतून नेण्यात येत आहे. हा प्रकल्प केपे, सांगे, धारबांदोडा व काणकोण या तालुक्यांतील कचऱ्याची प्रक्रिया करण्यासाठी असल्याचा दावा लोक करत आहेत.

त्यासंदर्भातील पत्र कुडचडे-काकोडा पालिकेने महामंडळाला ३१ ऑगस्ट २०२३ रोजी केले होते. आतापर्यंत सुमारे ५० टन कचरा काकोडा येथे नेण्यात आला आहे. काकोडा कचरा प्रकल्पाची क्षमता १०० टन प्रतिदिन आहे. हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. मडगाव पालिकेचा कचरा नेण्यापूर्वी या काकोडा प्रकल्पात अधिकाधिक २३ टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली होती.

ऑक्टोबरपासून काम : सोनसडो शेडमध्ये जमा करून ठेवलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम पालिकेने २.५ कोटी रुपये महामंडळाकडे जमा केल्यावर पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केले जाईल, अशी माहिती महामंडळाचे सदस्य सचिव लेविन्सन मार्टिन्स यांनी खंडपीठाला सादर केलेल्या अहवालात दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Naik: ‘अरे कोकणी गोव्याची राजभाषा आहे, कोकणीत बोल'! असा अधिकाऱ्यांना आग्रह करणारे, मराठी चळवळीतले 'रवी नाईक'

अग्रलेख: वीज दरवाढीचे ओझे केवळ सामान्य गोमंतकीयांवर पडणार नाही, याची दक्षता महत्त्वाची

Super Cup 2025: धेंपो क्लबची 'सुपर' मोहीम, ईस्ट बंगालविरुद्ध बांबोळीत लढत; फातोर्ड्यात बागान-चेन्नईयीन सामना

Ravi Naik: गोव्याच्या समृद्धतेत गांजलेल्या लोकांना मशाल दाखवण्याचे काम 'रवी नाईक' यांनी केले..

Mormugao: '..अन्यथा बेमुदत संपावर जाऊ'! मुरगाव पालिका कर्मचारी एकवटले, मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘पेन व टूल्स डाऊन’

SCROLL FOR NEXT